Tim David  Dainik Gomantak
क्रीडा

VIDEO: टीम डेव्हिडची पॉवर हिटिंग! चेन्नईच्या गोलंदाजांची काढली पिसं, 106 मीटरचा लगावला गगनचुंबी षटकार; चेंडू थेट स्टेडियमबाहेर

Tim David Longest Six in IPL 2026: डेव्हिडने केवळ 25 चेंडूंत 3 चौकार आणि तब्बल 8 षटकारांच्या मदतीसह नाबाद 70 धावांची तुफानी खेळी खेळली.

Manish Jadhav

RCB vs CSK Match : आयपीएल 2026 च्या रणधुमाळीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील महामुकाबला एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगला. या सामन्यात आरसीबीच्या फलंदाजांनी चेन्नईच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली. नाणेफेक हारल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीला आलेल्या आरसीबीने निर्धारित 20 षटकांत 250 धावांचा डोंगर उभा केला. आरसीबीला ही ऐतिहासिक धावसंख्या उभारण्यात टीम डेव्हिडने मोलाची भूमिका बजावली.

डेव्हिडने केवळ 25 चेंडूंत 3 चौकार आणि तब्बल 8 षटकारांच्या मदतीसह नाबाद 70 धावांची तुफानी खेळी खेळली. त्याच्या या वादळी खेळीमुळे चिन्नास्वामी स्टेडियमवर षटकारांचा पाऊस पडला आणि आरसीबीच्या (RCB) चाहत्यांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला.

या डावातील 19 वे षटक चेन्नईचा गोलंदाज जेमी ओव्हरटनसाठी एखाद्या भयानक स्वप्नासारखे ठरले. डेव्हिडने या एकाच षटकात तब्बल 30 धावा कुटल्या. ओव्हरटनच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्याने 2 धावा घेतल्या. तिसऱ्या चेंडूवर डेव्हिडने चौकार वसूल केला, तर शेवटच्या तीन चेंडूूंवर त्याने सलग तीन गगनभेदी षटकार खेचले. यातील एक षटकार तब्बल 106 मीटर लांब होता, ज्यामध्ये चेंडू थेट एम. चिन्नास्वामी स्टेडियमच्या छतावर जाऊन पडला. या भीमकाय फटक्याने मैदानावरील प्रेक्षक आणि खेळाडू दोघेही थक्क झाले.

आरसीबीने आता आयपीएलच्या इतिहासात तिसऱ्यांदा 250 पेक्षा जास्त धावा करण्याचा पराक्रम केला असून सनरायझर्स हैदराबाद (5 वेळा) नंतर ते या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचले आहेत.

चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध आयपीएलच्या इतिहासात 250 हून अधिक धावा करणारा आरसीबी हा आता पहिला संघ ठरला. यापूर्वी चेन्नईविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्सच्या नावे होता, ज्यांनी 231 धावा केल्या होत्या. आरसीबीने हा जुना रेकॉर्ड मोडीत काढत चेन्नईच्या गोलंदाजीचे वाभाडे काढले. विशेष म्हणजे, आरसीबीने आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत 36 वेळा 200 पेक्षा जास्त धावांचा टप्पा ओलांडला असून या बाबतीतही त्यांनी आपले वर्चस्व कायम राखले.

डेव्हिडच्या या तडाखेबंद फटकेबाजीमुळे चेन्नईसमोर विजयासाठी 251 धावांचे अवाढव्य आव्हान उभे राहिले. आरसीबीच्या फलंदाजीचा हा झंझावात पाहून पुन्हा एकदा चिन्नास्वामीवर 'आरसीबी... आरसीबी...' असा जयघोष ऐकू येत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GCA Cricket League: फिरकी गोलंदाजांची जबरदस्त 'दहशत', चौगुले-पणजी जिमखाना लढतीत दिवसभरात 22 विकेट्स गारद

Sawantwadi: सावंतवाडीत सात दुकाने फोडली, कणकवली पाठोपाठ धुडगूस; पोलिस यंत्रणेसमोर आव्हान

Redighat: रेडीघाट बनलाय 'अपघात घाट', तातडीने उपाययोजनांची मागणी; संरक्षक कुंपण, रस्ता रुंदीकरणाची गरज

साळ नदी की विषारी नाला? कोट्यवधींचा खर्च होऊनही 'जीवनदायिनी' मृत्यूच्या दारात

पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वामध्ये पावसाचा हाहाकार! 23 बालकांसह 45 जणांचा मृत्यू; 105 जणांच्या आयुष्याची राखरांगोळी

SCROLL FOR NEXT