Tilak Varma Dainik Gomantak
क्रीडा

Tilak Varma: 'रोहित भैय्याने नेहमीच....', आशिया कपसाठी टीम इंडियात निवड होताच तिलकने व्यक्त केला आनंद

India squad for Asia Cup: तिलक वर्माने आशिया चषकासाठी भारतीय संघात संधी मिळाल्याबद्दल प्रतिक्रिया देताना स्वप्नपूर्ती झाल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Pranali Kodre

Tilak Varma on Team India selection for Asia Cup 2023:

बीसीसीआयच्या निवड समितीने 21 ऑगस्ट रोजी आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी 17 जणांच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांचे दुखापतीनंतर भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.

तसेच तिलक वर्मालाही भारताच्या वनडे संघात पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. त्यामुळे आता त्याचे थेट आशिया चषकात भारताकडून वनडेत पदार्पण होऊ शकते. याबद्दल त्याने त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

तिलकने म्हटले आहे की ही स्वप्नपूर्ती आहे. याबरोबरच त्याने कर्णधार रोहित शर्माचे पाठिंब्याने मदत झाल्याचे सांगितले आहे.

बीसीसीआयशी बोलताना तिलकने सांगितले आहे की 'मी कधीही असे स्वप्न पाहिले नव्हते की मी वनडे प्रकारात थेट आशिया चषकात पदार्पण करेल. मी नेहमी वनडेत भारतीय संघासाठी पदार्पण करण्याचे स्वप्न पाहिले. ही गोष्ट माझ्यासाठी खूपच मोठी आहे.'

'मी हे स्पप्न पाहिलेले की मी वनडेत भारतासाठी पदार्पण करेल, पण मला एकाच वर्षात आंतरराष्ट्रीय टी२०चीही संघी मिळाली आणि आता अचानक पुढच्याच महिन्यात माझी आशिया चषकासाठीही निवड झाली. त्यामुळे नक्कीच हे माझे एक स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे आणि मी त्यासाठी तयारी करत आहे. '

वनडे क्रिकेट खेळण्याबद्दल तिलक म्हणाला, 'माझ्याकडे वनडे क्रिकेट खेळण्यासाठी चांगला आत्मविश्वास आहे, कारण मी बराच काळ वनडे क्रिकेट खेळत आहे, जसे की लिस्ट ए क्रिकेट.'

'मी माझ्या राज्यासाठी आणि संघांसाठी लिस्ट ए क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की मी वनडेमध्ये चांगला खेळ करू शकतो. त्यामुळे आता मी उत्सुक आहे.'

देशांतर्गत क्रिकेटमध्ये हैदराबादकडून खेळणाऱ्या तिलकने लिस्ट ए क्रिकेटमध्ये 25 सामने खेळले असून 56.18 च्या सरासरीने 5 शतके आणि 5 अर्धशतकांसह 1236 धावा केल्या आहेत.

रोहितच्या पाठिंब्याबद्दल तिलक म्हणाला, 'रोहित भैय्याने मला नेहमीच पाठिंबा दिला आहे. मी आयपीएलमध्ये खेळतानाही तो माझ्याजवळ यायचा. सुरुवातीला आयपीएलमध्ये खेळताना मी थोडा नर्वस होतो. तेव्हा तोच माझ्याजवळ आला आणि माझ्याशी सामन्याबद्दल बोलला.'

'मला त्याने खेळाचा आनंद घे आणि दबावमुक्त राहा, असं सांगितलं. तसेच त्याने सांगितलं की जेव्हाही तुला बोलावंस वाटेल, तेव्हा तू कधीही येऊ शकतो किंवा तू मला मेसेज कर मी नेहमीच तुझ्याबरोबर असेल.'

तिलक आयपीएलमध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सकडून गेल्या दोन हंगामात खेळला आहे.

तिलक पुढे म्हणाला, 'मी आयपीएलमध्ये स्वत:ला व्यक्त केले आणि मी सर्वत्र असेच करतो. हो मी नेहमीच त्याच्याशी (रोहितशी) बोलतो. तो प्रत्येकवेळी हेच सांगतो की खेळाचा आनंद घे. त्यामुळे मी तेच करत आहे.'

'मला खूप आनंद होत आहे की मी संघात आहे आणि मला आता तिथे चांगली कामगिरी करायची आहे. मी जे करत आहे, त्याचा आनंद घ्यायचा आहे. मला तिथेही आनंद घ्यायचा आहे.'

  • आशिया चषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, इशान किशन, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा.

    राखीव खेळाडू - संजू सॅमसन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऑफिसरसाहेब गोत्यात! नवरा रुममध्ये गर्लफ्रेंडसोबत असताना अचानक बायकोची एन्ट्री, रंगला हाय-व्होल्टेज ड्रामा Watch Video

पाकिस्तानात हिंदू मुलीचं अपहरण, जबरदस्तीनं धर्मांतर करुन मुस्लिम वृद्धाशी लावलं लग्न; कोर्टानं दिला 'हा' निर्णय

Viral Video: सायकलचं चाक लावून बाईकला जोडला पलंग, पठ्ठ्यानं झोपून चालवली गाडी; बिहारी तरुणाचा जुगाड तूफान व्हायरल

Viral Post: 'ब्रेकअप झालंय, कामात मन लागत नाही!' सुट्टीसाठी कर्मचाऱ्यानं केलेला मेल व्हायरल, पठ्ठ्याला मिळाली 10 दिवसांची सुट्टी

Margao Dindi Utsav: 'पंढरपूरला पोर्तुगीज जायला देत नाही तर प्रत्‍यक्ष पंढरपूरच मडगावी आणायचं’, आनंद पर्वणी दिंडी महाेत्‍सव

SCROLL FOR NEXT