Tilak Varma T20 Record Dainik Gomantak
क्रीडा

Tilak Varma T20 Record: 5 शतके आणि 30 अर्धशतके! टी-20 क्रिकेटमध्ये तिलक वर्माचा महापराक्रम, किंग कोहलीला सोडले मागे

Tilak Varma 5000 T20 Runs Milestone: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात रांची येथे खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात युवा फलंदाज तिलक वर्मा याने शानदार खेळीच्या जोरावर टी-20 क्रिकेटमध्ये एक रेकॉर्ड नोंदवला.

Manish Jadhav

Tilak Varma 5000 T20 Runs Milestone: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात रांची येथे खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात युवा फलंदाज तिलक वर्मा याने शानदार खेळीच्या जोरावर टी-20 क्रिकेटमध्ये एक रेकॉर्ड नोंदवला. या सामन्यात तिलकने अतिशय विस्फोटक फलंदाजी करत अवघ्या 18 चेंडूत नाबाद 44 धावांची तुफानी खेळी खेळली, ज्याच्या जोरावर त्याने टी-20 क्रिकेटमध्ये 5000 धावांचा टप्पा पूर्ण केला.

विशेष म्हणजे, टी-20 क्रिकेटच्या इतिहासात 40 पेक्षा अधिकची सरासरी आणि 140 पेक्षा जास्तच्या स्ट्राइक रेटसह 5000 धावांचा आकडा गाठणारा तो जगातील एकमेव फलंदाज ठरला. टी-20 क्रिकेटमध्ये एक उत्कृष्ट मॅच फिनिशर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिलक वर्माने आपल्या 175व्या सामन्यात आणि 166व्या डावात फलंदाजी करताना ही कामगिरी केली.

त्याने 41.57च्या सरासरीने आणि 145.36 च्या दमदार स्ट्राइक रेटने 5031 धावा केल्या, ज्यामध्ये 5 शतके आणि 30 अर्धशतकांचा समावेश आहे. या धमाकेदार कामगिरीसह टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांत 5000 धावा पूर्ण करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत त्याने दिग्गज फलंदाज विराट कोहलीला मागे सोडले.

सर्वात कमी डावांत 5000 टी-20 धावा करणारा विराट कोहली (Virat Kohli) आता सहाव्या क्रमांकावर असून, विराटने ही कामगिरी 167 डावांत केली होती, तर तिलकने ती 166 डावांत करुन दाखवली. या विशेष यादीत भारताचा विस्फोटक फलंदाज के. एल. राहुल अव्वल स्थानी, ज्याने अवघ्या 143 डावांत 5000 धावांचा पल्ला गाठला होता. त्याच्या पाठोपाठ ऋतुराज गायकवाड (145 डाव), शुभमन गिल (154 डाव) आणि अभिषेक शर्मा (165 डाव) यांचा क्रमांक लागतो. तिलक वर्माच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे केवळ भारतीय संघच नव्हे, तर संपूर्ण क्रिकेट वर्तुळात त्याचे कौतुक होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid:गोव्यात एफडीएचा दणका!बार्देशमधील 4 हॉटेल्स-विक्री केंद्रांचे कामकाज बंद करण्याचे आदेश

Cyber Fraud: गोव्यात ज्येष्ठ नागरिकाला 2.83 लाखांचा गंडा; भीती दाखवून बँक खात्यातून रक्कम लंपास, सायबर क्राईम पोलिस ठाण्यात FIR दाखल

Navratri Wishes In Marathi: नऊ दिवस, नऊ रंग अन् देवीच्या भक्तीचा सोहळा! शारदीय नवरात्रीनिमित्त WhatsApp स्टेटस, Facebook पोस्टसाठी खास मराठमोळ्या शुभेच्छा

Crime News: गोपाळ नाईक हाच सूत्रधार की पडद्यामागे आणखी कोणी? श्रीनिवास नायक गोळीबारप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू

Viral Video: "तो आमचा हिरो''! स्मित मच्छार यांच्यासाठी इस्त्रायली गायकानं गायली हनुमान चालीसा; यूजर्स म्हणाले, 'अंगावर शहारे आले...'

SCROLL FOR NEXT