Goa Football News Dainik Gomantak
क्रीडा

टायगर कप अखिल गोवा आंतरग्राम फुटबॉल स्पर्धेत दवर्ली, ड्युन्स क्लबची विजयी कूच

Goa Football News : नावेली येथील रोझरी मैदानावर बेताळभाटी क्लबने 23व्या मिनिटास आघाडी घेतली. ऑलिव्हर डिसोझाने हा गोल केला.

Kishor Petkar

पणजी : स्पोर्टिंग क्लब दवर्लीने बेताळभाटी स्पोर्टस क्लबवर 3-1असा, तर ड्युन्स स्पोर्टस क्लबने टायब्रेकरद्वारे पीव्हीसी पर्रा संघावर 4-2 असा विजय नोंदवून गोवा युनायटेड स्पोर्टस अकादमीच्या टायगर कप अखिल गोवा आंतरग्राम फुटबॉल स्पर्धेत विजयी कूच केली.

नावेली येथील रोझरी मैदानावर बेताळभाटी क्लबने 23व्या मिनिटास आघाडी घेतली. ऑलिव्हर डिसोझाने हा गोल केला. मात्र पुढच्याच मिनिटास सामनावीर ठरलेल्या सिडरॉय याने दवर्ली संघाला बरोबरी साधून दिली. 48व्या मिनिटास रीव्ह डिकॉस्ता याने, तर 56व्या मिनिटास सिडरॉयने सामन्यातील वैयक्तिक दुसरा गोल करून दवर्ली संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. (Tiger Cup 2022 All-Goa Inter-Village football tournament)

कळंगुट येथील पोरियाट मैदानावर निर्धारित वेळेत गोलशून्य बरोबरी झाल्यानंतर मांद्रेच्या ड्युन्स क्लबने पेनल्टी शूटआऊटवर बाजी मारली. त्यांच्यासाठी शशांक आश्वेकर, सिल्व्हेस्टर डायस, ह्रषीकेश किनळेकर आणि आल्बर्ट ब्रिटो यांनी अचूक नेम साधला. पर्रा संघातर्फे जॉस्टन कार्दोझ व शुभम मालवणकर यांनी पेनल्टी फटक्यांवर गोल केले.

फातोर्डा व्हेटरन्सचे चार गोल

स्पर्धेच्या व्हेटरन्स गटात फातोर्डा व्हेटरन्सने व्हिवा व्हेटरन्सवर 4-0 फरकाने दणदणीत विजय नोंदविला. सामना कांदोळी येथील डॉ. गुस्ताव मोंतेरो मैदानावर झाला. फातोर्डा संघाला चार्ल्स रॉड्रिग्जने 12व्या मिनिटास आघाडी मिळवून दिली. 27व्या मिनिटास उदय नाईकने गोल केला. 32व्या मिनिटास व्हिन्सेंट बार्बोझा याने संघाची आघाडी आणखी भक्कम केली. 45व्या मिनिटास सांतान कुलासोने फातोर्डा संघाला चार गोलची आघाडी मिळवून दिली. व्हिवा संघाचा ब्रँडन लोबो सामन्याचा मानकरी ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT