Indian Cricket Team Dainik Gomantak
क्रीडा

Ind Vs Eng T20 World Cup: इंग्लंडविरोधात सेमी फायनलमध्ये असा असेल भारतीय संघ

गोमन्तक डिजिटल टीम

Ind Vs Eng T20 World Cup: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ टी-20 वर्ल्ड कप 2022 मध्ये आज सेमीफायनल मॅच खेळत आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात कुणाकुणाचा समावेश केला आहे, त्याविषयी जाणून घेऊया.

भारतीय संघातील संभाव्य प्लेयिंग 11

रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक/ऋषभ पंत (विकेटकीपर), अक्षर पटेल, आर अश्विन/युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी और अर्शदीप सिंह.

ऍडलेड ओव्हल येथे दुपारी दीडला मॅच सुरू होणार आहे. टॉस नंतरच अंतिम 11 (Playing 11) खेळाडू कोणते असतील ते स्पष्ट होईल.

कार्तिक खेळणार की पंत याबाबत सस्पेन्स

या महत्वाच्या सामन्यात अंतिम ११ खेळाडुंमध्ये कर्णधार रोहित शर्मा काही बदल करू शकतो. या सामन्या दिनेश कार्तिकला संधी मिळणार की ऋषभ पंतला तसेच स्पिनर्सपैकी अश्विन खेळणार की चहल याची उत्सुकता चाहत्यांना आहे. रोहितने या सामन्यात पंत खेळेल, अशी हिंट दिली आहे. या मैदानावर स्पिनर्सची मदत मिळू शकते. त्यामुळे चहल की अश्विन यापैकी कोणता गोलंदाज खेळवायचा असा प्रश्न कर्णधार आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासमोर असेल. खेळपट्टीची स्थिती पाहून यावर निर्णय घेतला जाईल.

असा आहे इंग्लंडचा संघ

जोस बटलर (कर्णधार आणि विकेटकीपर), एलेक्स हेल्स, डेविड मलान/फिल साल्ट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक्स, लियाम लिविंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, क्रिस वोक्स, क्रिस जॉर्डन आणि आदिल राशिद.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

SCROLL FOR NEXT