BBL X/BBL
क्रीडा

BBL Video: गलती से मिस्टेक! थर्ड अंपायरने दाबले चुकीचे बटण अन् नाबाद फलंदाज झाला बाद, पाहा नंतर काय झालं

Pranali Kodre

Third Umpire presses wrong button and accidentally gives batter out during Melbourne Stars vs Sydney Sixers match in BBL:

ऑस्ट्रेलियामध्ये सध्या बिग बॅश लीग स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत शनिवारी (6 जानेवारी) मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर मेलबर्न स्टार्स आणि सिडनी सिक्सर्स संघात सामना झाला. या सामन्यात एक अनोखी घटना घडली, तिसरे पंच पॉल विल्सननी चुकून नाबादऐवजी बादचे बटण दाबले होते.

झाले असे की सिडनी सिक्सर्ससमोर विजयासाठी 157 धावांचे आव्हान होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सिक्सर्सकडून जोश फिलिप आणि जेम्स विन्स उतरले. यावेळी तिसऱ्या षटकात जेम्स विन्सने सरळ फटका खेळला, तेव्हा गोलंदाज इमाद वासिमने चेंडूला स्पर्श करत नॉन स्ट्रायकरला असलेल्या फिलिपला बाद करण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळे मैदानावरील पंचांनी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला. रिव्ह्युमध्ये दिसले की चेंडू स्टंपला लागण्यापूर्वी फिलिप क्रिजमध्ये परतला आहे, त्यामुळे तो नाबाद आहे. मात्र, मोठ्या स्क्रिनवर फिलिप बाद असल्याचे दाखवण्यात आले. त्यामुळे सर्वच चकीत झाले.

त्यावेळी मैदानावरील पंचांनी सर्वांना योग्य निर्णयाची प्रतिक्षा करण्यास सांगितले. त्यानंतर पुन्हा फिलिप नाबाद घोषित करण्यात आले आणि मग खेळ पुन्हा सुरू झाला. यावेळी खेळाडूंनाही त्यांचे हसू रोखता आले नाही. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

दरम्यान, फिलिप नंतर पाचव्या षटकात 9 धावांवर बाद झाला. मात्र, नंतर विन्सने 79 धावांची खेळी केली, तसेच डॅनिएल ह्यूजबरोबर 99 धावांची भागादीरी करत सिक्सरच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. ह्यूजने 41 धावा केल्या.

सिक्सर्सने 157 धावांचे आव्हान 18.1 षटकात 3 विकेट्स गमावत 160 धावा करून सहज पूर्ण केले. मेलबर्न स्टार्सकडून स्कॉट बोलंडने २ विकेट्स घेतल्या.

तत्पुर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या मेलबर्न स्टार्सकडून डॅनिएल लॉरेन्सने सर्वाधिक 36 धावांची खेळी केली. तसेच कर्णधार ग्लेन मॅक्सवेल (31), मार्कस स्टॉयनिस (34), हिल्टन कार्टराईट (29), थॉमस रॉजर्स (19) यांनी छोटेखानी खेळी केल्या. त्यामुळे मेलबर्न स्टार्सने 20 षटकात 4 बाद 156 धावा उभारल्या.

सिडनी सिक्सर्सकडून गोलंदाजी करताना टॉड मर्फीने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

Saint Estevam Accident: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी मित्र कल्पराज आणि प्रेयसीची दोन तास चौकशी; पोलिसांकडून प्रश्नांची सरबत्ती!

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

Sunburn Festival 2024: सनबर्नविरोधात कामुर्लीत स्थानिकांचा कडक विरोध; उद्याची बैठक ठरणार निर्णायक!

Mhadei Water Dispute: ...कर्नाटकाविरोधात लढण्यास सावंत सरकार ठरले कुचकामी; आलेमाव यांचा घणाघात

SCROLL FOR NEXT