सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी भारतीय संघात सुचविले काही बदल Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup: भारतीय संघात फार बदल करणे गरजेचे नाही, 'या' दोघांचा विचार व्हावा

भारताचे (India) माजी अनुभवी फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी भारतीय संघात सुचविले काही बदल, जर तुम्ही संघात खूप बदल केलेत तर विरोधी संघाला समजेल की तुम्ही नर्व्हस आहात. असेही त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमन्तक

T20 विश्वचषकाच्या (T-20 World Cup) गट 2 मध्ये भारताचा पुढील सामना रविवारी 31 नोव्हेंबर रोजी न्यूझीलंडशी (New Zealand) होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होईल. भारताला उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा कायम ठेवायच्या असतील तर हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल. या सामन्यापूर्वी भारताचे (India) अनुभवी फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी भारतीय संघात काही बदल सुचवले आहेत.

खूप बदलाची नाही गरज

भारतीय संघात कोणताही बदल करण्याची गरज नाही, असे मत सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले. पण दोन खेळाडूंवर थोडे लक्ष देण्याची गरज आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार, या व्यतीरिक्त खूप जास्त बदल केल्यास भारत घाबरला असेल असे न्यूझीलंडला वाटेल, असा इशारा देखील गावस्कर यांनी दिला आहे.

ईशान-पांड्यापेक्षा चांगल्या फॉर्ममध्ये

खांद्याच्या दुखापतीमुळे हार्दिक पांड्या गोलंदाजी करत नसल्याचे गावस्कर यांनी सांगितले होते. तो फक्त फलंदाज म्हणून संघात खेळत असेल तर त्याच्या ऐवजी ईशान किशनला संधी द्यायला हरकत नाही, कारण तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आयपीएलच्या शेवटच्या सामन्यांमध्ये त्याने चमकदार कामगिरी केली आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये भुवनेश्वर कुमारचा फॉर्मही विशेष हरविला आहे, असे गावसकर यांनी सांगितले. अशा स्थितीत शार्दुल ठाकूरला त्याच्या जागी संघात स्थान मिळू शकते. पण जर तुम्ही संघात खूप बदल केलेत तर विरोधी संघाला समजेल की तुम्ही नर्व्हस आहात. असेही गावसकर यांनी स्पष्ट केले.

पांड्याने गोलंदाजी केली नाही

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी केली नाही. मात्र, बुधवारी पांड्या नेटमध्ये गोलंदाजी करताना दिसला. अशा स्थितीत पांड्या न्यूझीलंडविरुद्ध गोलंदाजी करू शकतो. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात पांड्या एक किंवा दोन षटके टाकण्याची शक्यता व्यक्त केली होती. पण त्याने एकही षटक टाकले नाही. खांद्याच्या दुखापतीनंतर तो मैदानात देखील उतरला नाही. त्याच्या जागी ईशान किशनने क्षेत्ररक्षण केले. पांड्या आणि भुवनेश्वर वगळता संघात कोणतेही बदल केले जाणार नाहीत, अशी अपेक्षा गावस्कर यांनी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Islamic State Rebels Attack: कांगोमध्ये रक्तपात! चर्चवरील हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, IS समर्थित दहशतवाद्यांचा हात

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral: मास्तर बनला प्रभु देवा...मुकाबला गाण्यावर केला जबरदस्त डान्स; पोरं झाली थक्क, WATCH VIDEO

Shravan Somvar 2025: मन:शांती आणि समस्यामुक्तीसाठी श्रावण सोमवार; जाणून घ्या रुद्राभिषेकाचे महत्त्व आणि सोपी पद्धत

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

SCROLL FOR NEXT