Womens Premier League Dainik Gomantak
क्रीडा

WPL: 'या' दिवशीपासून रंगणार बीसीसीआयच्या पहिल्या महिला प्रीमियर लीग T-20 चा थरार

23 दिवस चालणार स्पर्धा, आयपीएलच्या 3 फ्रँचायझींचेही संघ

Akshay Nirmale

Womens Premier League: इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या धर्तीवर BCCI प्रथमच महिला प्रीमियर लीग (WPL) चे आयोजन करत आहे. लीग कधी सुरू होणार आणि कुठे होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

आता ही बाब उघड झाली आहे. आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांच्या माहितीनुसार 4 मार्च ते 26 मार्च दरम्यान मुंबईत महिला प्रीमियर लीग खेळवली जाणार आहे.

धुमाळ यांनी देखील पुष्टी केली की लीगसाठी खेळाडूंचा लिलाव पाकिस्तान विरुद्ध भारताच्या T20 विश्वचषकाच्या सामन्यानंतर 13 फेब्रुवारी रोजी मुंबईत होणार आहे. लीगचे सर्व सामने ब्रेबॉर्न स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहेत. पहिला सामना गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स या फ्रँचायझी संघांमध्ये खेळला जाण्याची शक्यता आहे.

बीसीसीआय महिला प्रीमियर लीगच्या तयारीत व्यस्त आहे. 5 संघांच्या बोलीतून 4669.99 कोटी रुपये मिळाल्यानंतर बोर्डाने या लीगचे प्रसारण हक्क 951 कोटी रुपयांना विकले. यासह, महिला प्रीमियर लीग ही आयपीएलनंतर जगातील दुसरी सर्वात मोठी टी-20 लीग बनली.

आयपीएलच्या तीन फ्रँचायझींचे संघ

या लीगमध्ये संघ खरेदी करण्यात आयपीएलच्या तीन फ्रँचायझींना यश आले आहे. मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स व्यतिरिक्त, कॅप्री ग्लोबल होल्डिंग्स (लखनौ) आणि अदानी स्पोर्टलाइन यांनी महिला प्रीमियर लीगसाठी फ्रेंचायझी संघ विकत घेतले आहेत.

1500 खेळाडूंची नोंदणी

महिला प्रीमियर लीगसाठी सुमारे 1500 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. येत्या काही दिवसांत खेळाडूंची अंतिम यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. 13 फेब्रुवारीला होणाऱ्या लिलावात प्रत्येक फ्रँचायझी खेळाडूंवर 12 कोटी रुपये खर्च करू शकणार आहे. संघांना किमान 15 आणि जास्तीत जास्त 18 खेळाडूंसाठी बोली लावावी लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT