Team India Dainik Gomantak
क्रीडा

IRE vs IND, 3rd T20I: आयर्लंडविरुद्धचा तिसरा टी-20 सामना पावसामुळे रद्द, भारताने मालिका 2-0 ने जिंकली

भारत आणि आयर्लंड यांच्यात होणारा तिसरा टी-20 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. भारताने ही मालिका 2-0 अशी खिशात घातली.

Manish Jadhav

IRE vs IND, 3rd T20I: भारत आणि आयर्लंड यांच्यात होणारा तिसरा टी-20 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. भारताने ही मालिका 2-0 अशी खिशात घातली. भारतासाठी या मालिकेत अनेक सकारात्मक बाबी होत्या, त्यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जसप्रीत बुमराहचे तंदुरुस्त झाल्यानंतर टीम इंडियात पुनरागमन.

याशिवाय, या मालिकेत रिंकू सिंहसारख्या उदयोन्मुख खेळाडूला पदार्पणाची संधी मिळाली. रिंकूने मिळालेल्या संधीचं सोनं केलं. दुसऱ्या सामन्यातच तो 'सामनावीर' ठरला. आता भारतीय संघ 2 सप्टेंबर रोजी आशिया कपच्या सामन्यात थेट मैदानात उतरणार आहे.

या खेळाडूंनी लय साधली

दरम्यान, स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि प्रसिद्ध कृष्णा आयर्लंड दौऱ्यासाठी दुखापतीतून परतले. या दोन्ही खेळाडूंनी पहिल्या दोन टी-20 सामन्यांमध्ये विस्फोटक गोलंदाजी केली.

या दोघांची आता आशिया चषकातही निवड झाली असून आशिया चषकापूर्वी त्यांनी ही लय साधली आहे. दोन्ही खेळाडूंनी मालिकेतील 2 सामन्यात 4-4 विकेट घेतल्या.

रिंकू सिंहने आपली ताकद दाखवून दिली

दुसरीकडे, रिंकू सिंहने आयर्लंड दौऱ्यावर टीम इंडियासाठी (Team India) टी-20 पदार्पण केले. त्याने आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने सर्वांची मने जिंकली.

दुसऱ्या T20 सामन्यात त्याने 21 चेंडूत 38 धावा केल्या, ज्यात 2 चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. त्याच्याशिवाय ऋतुराज गायकवाडनेही दुसऱ्या टी-20 सामन्यात 58 धावांची खेळी खेळली होती.

दोन्ही संघ

आयर्लंड - रॉस अडायर, पॉल स्टर्लिंग (सी), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (wk), कर्टिस कॅम्पर, गॅरेथ डेलेनी, मार्क अॅडायर, बॅरी मॅककार्थी, क्रेग यंग, ​​थिओ व्हॅन वूरकोम, बेंजामिन व्हाइट.

भारत- यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, संजू सॅमसन (wk), रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह (क), रवी बिश्नोई, मुकेश कुमार, शाहबाज अहमद, जितेश शर्मा, आवेश खान.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT