Vijay Merchant Trophy
Vijay Merchant Trophy Dainik gomantak
क्रीडा

Vijay Merchant Trophy: ‘‘आघाडी’ची शर्यत गोव्याने जिंकली; झारखंडविरुद्धचा सामना अनिर्णित

दैनिक गोमंतक

पणजी : झारखंडने पहिल्या डावातील आघाडीसाठी आटोकाट प्रयत्न केले, त्यांच्या शेवटाकडील फलंदाजांनीही चिवट प्रतिकार केला, तरीही गोव्याने आपली धावसंख्या प्रतिस्पर्ध्यांना पार करू दिली नाही आणि 16 वर्षांखालील विजय मर्चंट करंडक स्पर्धेतील अनिर्णित लढतीत तीन गुणांची कमाई केली.

(The match between Goa and Jharkhand in the Under 16 Vijay Merchant cricket Trophy ended in a draw)

नागपूर येथे तीन दिवसीय सामना झाला. गोव्याने पहिल्या डावात 385 धावा केल्यानंतर झारखंडने सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर शनिवारी 2 बाद 110 धावा केल्या होत्या. रविवारी सामन्याच्या शेवटच्या दिवशी झारखंडचा पहिला डाव 355 धावांत संपुष्टात आला. गोव्याला 30 धावांची आघाडी मिळाली, त्या जोरावर त्यांनी तीन गुण प्राप्त केले. आता चार लढतीनंतर गोव्याचे सहा गुण झाले आहेत. त्यांचा गटसाखळीतील शेवटचा सामना बुधवारपासून (ता. 21) बंगालविरुद्ध होईल.

झारखंडचा कर्णधार विवेक कुमार याचे शतक पाच धावांनी हुकले. त्याने तिसऱ्या विकेटसाठी वत्सल तिवारी याच्यासमवेत 96 धावांची भागीदारी केली. नंतर विवेकने डेव्हिड याच्यासमवेत पाचव्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी करून झारखंडच्या आघाडी घेण्याच्या आशा पल्लवित केल्या.

जम बसलेले फलंदाज बाद झाल्यानंतर नवव्या क्रमांकावरील हसन याने किल्ला लढविला. त्याने नवव्या विकेटसाठी टेअर्स याच्यासमवेत 33 धावांची भागीदारी केली, मात्र कर्णधार यश कसवणकर याने या दोघांना पाच धावांच्या अंतराने बाद करून गोव्याच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

यश कसवणकरने टिपले 6 गडी

गोव्याचा कर्णधार फिरकी गोलंदाज यश कसवणकर याने डावात झारखंडचे 6 गडी बाद करण्याची किमया साधली. 49 षटकांत त्याने एकूण 152 धावा मोजल्या. स्पर्धेत डावात 5 गडी बाद करण्याची त्याची ही दुसरी वेळ आहे. अरुणाचल प्रदेशविरुद्ध त्याने पहिल्या डावात 83 धावांत 5 विकेट मिळविल्या होत्या. स्पर्धेतील सहा डावात त्याने 19 गडी बाद केले आहेत.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव: 385 अनिर्णित विरुद्ध झारखंड, पहिला डाव : 122 षटकांत सर्वबाद 355 (वत्सल तिवारी 70, विवेक कुमार 95, डेव्हिड 71, रोहित 18, अभयकुमार सिंग 18, हसन 28, टेयर्स 8, यश कसवणकर 49-11-152-6, वेदांत डब्राल 28-5-60-3, सिश्त प्रकाश 9-2-27-0, चिगुरुपती व्यंकट 23-8-56-1, दिशांक मिस्कीन 6-0-30-0 द्विज पालयेकर 7-0-14-0).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

‘या’ देशाच्या माजी मंत्र्याच्या पत्नीची निर्घृण हत्या, खळबळजनक खुलासा; व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Supreme Court: राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या सदस्यांना कोर्टाने फटकारले; आदेशाच्या उल्लंघनबाबत बजावली अवमानाची नोटीस

SCROLL FOR NEXT