ISL football : एफसी गोवाचा वेग कायम; नॉर्थईस्टला 2-1 ने नमवले

नॉर्थईस्टचा सलग दहावा पराभव
ISL football
ISL footballDainik Gomantak

पणजी: एफसी गोवाने तळातील कमकुवत नॉर्थईस्ट युनायटेडवर मात करून इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धेत सहावा विजय नोंदविला, पण या कामगिरीत क्लीनचीट न राखल्याची खंत अनुभवी मध्यरक्षक एदू बेदिया याने व्यक्त केली. संघाकडून त्याने आणखी सुधारित खेळाची अपेक्षा व्यक्त केली.

(FC Goa defeated Northeast United in the ISL football tournament)

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर शनिवारी रात्री एफसी गोवा संघाने 2-1 फरकाने विजय नोंदविला. त्यांचे आता 10 लढतीतून 15 गुण झाले असून ते पाचव्या स्थानी आहेत. नॉर्थईस्टला सलग दहावा पराभव पत्करावा लागला.

एदू व इकेर ग्वोर्रोचेना यांनी एफसी गोवासाठी पूर्वार्धात गोल केल्यानंतर सामन्याच्या इंज्युरी टाईममध्ये पेनल्टी गोलवर विल्मार जॉर्डन याने गुवाहाटीतील संघाची पिछाडी कमी केली. पराभूत निकालानंतर एफसी गोवाने उसळी घेत सलग दोन सामने जिंकले आहेत. गत आठवड्यात त्यांनी ओडिशाला फातोर्ड्यात नमविले होते.

सामन्यानंतर 33 वर्षीय एदू म्हणाला, ‘‘आम्ही लढतीत सलग चांगला खेळ केला नाही, याहून चांगली कामगिरी आम्हाला शक्य होती. शेवटची शिट्टी फुंकण्यापूर्वी आम्ही एकाग्रता गमावली. त्यामुळे आम्हाला स्पर्धेत पाचव्यांदा क्लीन शीट राखता आली नाही. अव्वल संघात स्थान मिळविण्यासाठी आम्हाला एकाग्रता साधणे महत्त्वाचे आहे. पुढील सामने महत्त्वाचे आहेत. या लढतीतून आम्ही बोध घेतला आहे आणि त्या बळावर आणखी गुण प्राप्त करू.’’

ISL football
Indian cricketer wedding : 'हा' भारतीय क्रिकेटपटु अडकणार लग्नबंधनात

सातत्यात वाढ होणे गरजेचे : पेनया

सामन्यानंतर एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक कार्लोस पेनया यांनी संघाच्या कामगिरीतील सातत्यात वाढ होण्याची गरज प्रतिपादली. ‘‘सामन्यातील जास्त मिनिटे आम्हाला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. उदाहणार्थ, आम्ही पहिल्या तीस मिनिटांत छान खेळ केला, मात्र बाकी साठ मिनिटांत आम्ही चांगले खेळलो नाही.

या लढतीत त्याचा फटका आम्हाला बसला नाही, पण प्रत्येक दिवशी असेच घडणार नाही. तरीही, मला वाटते की आम्ही चांगल्या स्थितीत आहोत. चौथ्या, पाचव्या व सहाव्या क्रमांकाचा विचार करता गुणांत सर्व संघ समान आहेत. आता आगामी लढतीचा विचार करून आम्हाला पुढे जायचे आहे.’’

ISL football
FIFA World Cup 2022: फ्रान्स-अर्जेंटिना वर्ल्डकपसाठी झुंजणार, 'हे' ५ खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
  • एदू बेदियाचे डझनभर आयएसएल गोल

  • स्पॅनिश मध्यरक्षकाचे आयएसएल स्पर्धेत आता 12 गोल

  • एकूण ९6 लढतीत 14 असिस्टचीही नोंद

  • यंदा 9 सामन्यांत 2 गोल, 1 असिस्ट

  • आयएसएल स्पर्धेत सलग 6 मोसम

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com