FIFA World Cup 2022: फ्रान्स-अर्जेंटिना वर्ल्डकपसाठी झुंजणार, 'हे' ५ खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'

फिफा वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात सर्वांचेच लक्ष असणाऱ्या ५ खेळाडूंबद्दल जाणून घ्या.
FIFA World Cup 2022
FIFA World Cup 2022Dainik Gomantak
Published on

FIFA World Cup 2022: फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स यांच्यात खेळला जाणार आहे. विजेतेपदासाठीचा हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8.30 वाजता कतारमधील लुसैल स्टेडियमवर सुरू होईल.

दरम्यान विश्वविजेतेपद मिळवण्यासाठी दोन्ही संघाच चुरस पाहायला मिळेलच, पण या सामन्यात सर्वाधिक कोणत्या 5 खेळाडूंवर लक्ष असेल, हे जाणून घेऊ.

Antoine Griezmann
Antoine GriezmannDainik Gomantak

5. अँटोनी ग्रिझमन, फ्रान्स

फ्रान्सचा 31 वर्षीय अँटोनी ग्रिझमन फॉरवर्डला खेळतो. तो फ्रान्सच्या आक्रमणाचा महत्त्वाचा भागही आहे. त्याने उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडविरुद्ध फ्रान्सने केलेल्या दोन्ही गोलसाठी असिस्टही केले होते. त्यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला होता. त्याने यावर्षी वर्ल्डकपमध्ये 3 असिस्ट केले आहेत.

विशेष म्हणजे 2018 मध्ये विश्वविजेतेपद जिंकलेल्या फ्रान्सच्या संघाचाही तो भाग होता आणि त्याने अंतिम सामन्यात सामनावीराचा पुरस्कारही जिंकला होता. त्यामुळे यावर्षीच्या अंतिम सामन्यातही त्याच्याकडून फ्रान्सला अशाच खेळाची अपेक्षा असणार आहे.

Olivier Giroud
Olivier GiroudDainik Gomantak

4. ऑलिव्हर गिरोड, फ्रान्स

ऑलिव्हर गिरोड देखील फ्रान्सच्या संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. या वर्ल्डकपला फ्रान्सच्या करिम बेंझेमाला मुकावे लागले होते. पण असे असतानाही त्याची कमी गिरोडने भासू दिली नाही आणि त्याने आपली जबाबदारी आत्तापर्यंत चोख बजावली.

त्याने यावर्षीही बाद फेरींच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने उपउपांत्यपूर्व आणि उपांत्यपूर्व फेरीत गोलही केले आहेत. तसेच तो गोल्डन बूटच्या शर्यतीतही आहे. त्याने आत्तापर्यंत 4 गोल केले आहेत. त्यामुळे तो आता अंतिम सामन्यात कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

Julian Alvarez
Julian AlvarezDainik Gomantak

3. ज्युलियन अल्वारेझ, अर्जेंटिना

अर्जेंटिनाचा युवा खेळाडू ज्युलियन अल्वारेझने यावर्षीच्या वर्ल्डकपमधून सर्वांचेच लक्ष वेधले आहे. त्याला अगदी सुरुवातीच्या दोन सामन्यांत पहिल्या 11 जणांच्या संघात संधीही मिळाली नव्हती. पण, या 22 वर्षीय खेळाडूने अखेरच्या 4 सामन्यांपैकी 3 सामन्यांत गोल करण्याची करामत करून दाखवली आहे.

तो या वर्ल्डकपमध्ये 4 गोल करत गोल्डन बूटच्या शर्यतीतही सामील झालेला आहे. त्याने क्रोएशियाविरुद्ध उपांत्य सामन्यातही दोन गोल करत महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्यामुळे आता तोही अंतिम सामन्यात अर्जेंटिनासाठी काय कमाल करणार हे पाहावे लागेल.

Kylian Mbappe
Kylian MbappeDainik Gomantak

2. कायलियन एमबाप्पे, फ्रान्स

फ्रान्सच्या संघामध्ये सर्वाधिक लक्ष असेल, ते काईल एमबाप्पेवर. 23 वर्षीय एमबाप्पेने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये शानदार कामगिरी करताना 5 गोल केले आहेत. विशेष म्हणजे त्याचे पाचही गोल मैदानी गोल आहेत. त्यामुळे गोल्डन बूटच्या शर्यातीतही तो आघाडीवर आहे.

एमबाप्पेने 2018 मध्येही फ्रान्ससाठी वर्ल्डकपमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली होती. त्यामुळे याहीवेळी त्याच्याकडून फ्रान्सला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. तसेच त्याने त्याची चांगली लय अंतिम सामन्यातही कायम ठेवावी, अशी अपेक्षा त्याच्या चाहत्यांना असेल.

Lionel Messi
Lionel MessiDainik Gomantak

1. लिओनल मेस्सी, अर्जेंटिना

अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनल मेस्सीवर तर या स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच सर्वांचे लक्ष आहे. आत्तापर्यंत यावर्षी 5 गोल केलेल्या मेस्सीला अंतिम सामन्यात विजय मिळवण्याची आशा असेल, कारण हा त्याचा अखेरचा वर्ल्डकप आहे. त्यामुळे अर्जेंटिनाचा संघही त्याला वर्ल्डकप विजयाची भेट देण्यास उत्सुक असेल.

दरम्यान, मेस्सीचा या संपूर्ण वर्ल्डकपमध्येचा चांगला खेळ राहिला आहे. त्याने 5 गोलबरोबरच 3 असिस्टही केले आहेत. त्यामुळे आता अंतिम सामन्यात मेस्सी कशी कामगिरी करणारा याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com