Kazakhstan Minister Kuandyk Bishimbayev Killed Wife Saltanat Nukenova: कझाकिस्तानमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कझाकिस्तानच्या एका माजी मंत्र्यावर पत्नीला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. सध्या ही घटना संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, 31 वर्षीय साल्टानॅट नुकेनोवा यांचा पती कुआंडिक बिशिम्बायेव यांच्या नातेवाईकाच्या मालकीच्या हॉटेलमध्ये खून झाल्याचे आढळून आले. दोघांनीही अख्खा दिवस आणि रात्र त्या हॉटेलमध्ये घालवली होती. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, 44 वर्षीय कुआंडिक बिशिम्बायेव यांचे 8 तासांचे फुटेज न्यायालयासमोर सादर करण्यात आले, ज्यामध्ये ते त्यांची पत्नी साल्टानॅट नुकेनोवाला मारहाण करत होते. या फुटेजमध्ये आरोपी आपल्या पत्नीला अतिशय बेदम मारहाण करताना दिसत आहे.
दरम्यान, कझाकिस्तानचे माजी मंत्री आपल्या पत्नीला केसांनी ओढून एका वेगळ्या खोलीत घेऊन जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसले. फिर्यादीने खटल्यादरम्यान न्यायालयाला सांगितले की, जेव्हा पत्नी साल्टानॅट यांनी टॉयलेटमध्ये लपून पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा बिशिम्बायेव यांनी दरवाजा तोडला, त्यांना बाहेर काढले आणि मारहाण सुरुच ठेवली. साल्टानॅट यांना टॉयलेटच्या बाहेर ओढल्यानंतर त्यांनी त्यांचा गळा दाबून धरला. त्यानंतर त्या बेशुद्ध पडल्या.
पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडली. यानंतर आरोपी बिशिम्बायेव यांनी कोणालातरी फोन केला. ओळखीच्या व्यक्तीने पत्नी बरी होईल असे सांगितले. मात्र 12 तासांनंतर रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली असता वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी साल्टानॅट यांना मृत घोषित केले. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये साल्टानॅट यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात आले. मारहाणीत त्यांच्या नाकातील हाड तुटले. त्यांच्या चेहऱ्यावर, डोक्यावर, हातावर अनेक जखमा होत्या. हत्येप्रकरणी सुनावणी करताना न्यायालयाने सांगितले की, आरोपी पतीला 20 वर्षे तुरुंगवास भोगावा लागेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.