Usman Tariq  Dainik Gomantak
क्रीडा

VIDEO: 'द हंड्रेड' स्पर्धेत पाकिस्तानी गोलंदाजाचा नवा ड्रामा! उस्मान तारिकच्या बॉलिंग ॲक्शनवर टिम डेव्हिडचा संताप, व्हिडिओ व्हायरल

Usman Tariq Bowling Action Controversy: ट्रेंट रॉकेट्स आणि बर्मिंघम फीनिक्स यांच्यात खेळल्या गेलेल्या रोमांचक सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज टिम डेव्हिड याने तारिकच्या चेंडू टाकण्याच्या ॲक्शनवर थेट प्रश्न उपस्थित केले.

Manish Jadhav

Usman Tariq Bowling Action Controversy: पाकिस्तानचे क्रिकेटपटू आणि वाद हे समीकरण काही नवीन नाही. सध्या इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या 'द हंड्रेड 2026' या प्रतिष्ठित टी-20 स्पर्धेत पाकिस्तानचा ऑफ-स्पिनर उस्मान तारिक याच्या संशयास्पद बॉलिंग ॲक्शनवरुन पुन्हा एकदा मोठा गदारोळ माजला. ट्रेंट रॉकेट्स आणि बर्मिंघम फीनिक्स यांच्यात खेळल्या गेलेल्या रोमांचक सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज टिम डेव्हिड याने तारिकच्या चेंडू टाकण्याच्या ॲक्शनवर थेट प्रश्न उपस्थित केले. तारिकच्या चेंडूवर यष्टीरक्षकाकडे झेलबाद झाल्यानंतर डेव्हिड अत्यंत नाराज दिसला आणि त्याने मैदान सोडण्यापूर्वी अंपायरकडे चेंडू 'नो-बॉल' घोषित करण्याची आक्रमक मागणी केली.

अंपायरने आपली मागणी फेटाळून लावल्यानंतर टिम डेव्हिडने सुरुवातीला रिव्ह्यू घेण्याचा विचार केला, मात्र नंतर तो तसाच तंबूत परतला. उस्मान तारिकच्या बॉलिंग ॲक्शनवर प्रश्न उपस्थित होण्याची ही पहिलीच वेळ नाही, तर यापूर्वीही अनेक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत सामन्यांमध्ये त्याच्या बॉलिंगवर बंदी घालण्याची मागणी झाली. 2024 च्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये अंपायर आसिफ याकूब आणि रिचर्ड इलिंगवर्थ यांनी तारिकच्या संशयास्पद ॲक्शनची अधिकृत तक्रार मॅच रेफरीकडे केली होती. त्यानंतर 2025 च्या पीएसएल हंगामातही मैदानातील पंचांनी पुन्हा एकदा त्याच्या बॉलिंगवर आक्षेप नोंदवला होता.

विशेष म्हणजे, याच वर्षी ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियन ऑलराउंडर कॅमेरन ग्रीन यानेही उस्मान तारिकच्या ॲक्शनवर आक्षेप घेतला होता. बाद झाल्यानंतर ग्रीनने मैदानावर बेसबॉल फेकल्यासारखा इशारा करत तारिक चेंडू थ्रो करत असल्याचे दर्शवले होते. आता टिम डेव्हिडच्या या ताज्या प्रकरणामुळे उस्मान तारिकच्या बॉलिंग ॲक्शनचा वाद जागतिक क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा पेटला असून आयसीसी यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT