Goa: केंद्र सरकारच्या खेलो इंडिया योजनेअंतर्गत (central government's Khelo India scheme) फातोर्डा येथे गोवा फुटबॉल असोसिएशन (Goa Football Association) फुटबॉल केंद्र सुरू करणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष चर्चिल आलेमाव यांनी सोमवारी दिली. आलेमाव यांनी सांगितले, की दक्षिण गोवा खेलो इंडिया जिल्हा केंद्र जीएफएला मंजूर करण्यात आले आहे.
उत्तर गोवा जिल्ह्यात हॉकी केंद्र असेल व त्याचे व्यवस्थापन गोवा हॉकी संघटनेकडे असेल. फातोर्डा येथील ॲस्ट्रो टर्फ फुटबॉल मैदानावर गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने खेलो इंडिया फुटबॉल केंद्र कार्यान्वित होईल. याठिकाणी तीस नियमित प्रशिक्षणार्थींची सोय असेल. त्यांना खेलो इंडिया केंद्र नियमावलीनुसार पात्र प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभेल.
गोवा फुटबॉल असोसिएशनने फुटबॉलमधील पायाभूत कार्यक्रम सुरू केला असून 14, 16, 18 वर्षांखालील खेळाडूंवर भर देण्यात आला आहे, अशी माहिती आलेमाव यांनी दिली. खेलो इंडिया फुटबॉल केंद्रात 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुला व मुलींना त्यांचे कौशल्य व गुणवत्ता विकसित करण्यासाठी उपयुक्त असेल. तळागाळातील फुटबॉलला प्रोत्साहन देणे आणि योग्य प्रकारे आखलेले धोरण अंमलात आणणे यावर जीएफएचा भर आहे. ही योजना फिफा आणि अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) विचारसरणीशी जुळणारी आहे, असे आलेमाव यांनी नमूद केले. फुटबॉल प्रशिक्षण केंद्र योजनेतून फुटबॉलवेड्या गोव्यात युवा फुटबॉलपटूंची नवी पिढी विकसित करण्यावर भर राहील, असेही जीएफए अध्यक्षांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.