Pakistan Dainik Gomantak
क्रीडा

PAK vs AUS: पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया सीरीजवर दहशतवादी हल्ल्याचं सावट !

सुरक्षेच्या मुद्द्यावर अपयशी ठरल्यामुळे दीर्घकाळ जगातील अव्वल क्रिकेट संघांच्या यजमानपदापासून वंचित राहिलेल्या पाकिस्तानसाठी (Pakistan) 4 मार्च हा ऐतिहासिक दिवस ठरला आहे.

दैनिक गोमन्तक

सुरक्षेच्या मुद्द्यावर अपयशी ठरल्यामुळे दीर्घकाळ जगातील अव्वल क्रिकेट संघांच्या यजमानपदापासून वंचित राहिलेल्या पाकिस्तानसाठी (Pakistan) 4 मार्च हा ऐतिहासिक दिवस ठरला आहे. सुमारे 24 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर, ऑस्ट्रेलियन संघ पहिल्यांदाच कसोटी मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानात दाखल झाला आहे. (The Blast In Peshawar Has Raised Questions About The Continuation Of The Pakistan Australia Series)

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना रावळपिंडीतील (Rawalpindi) प्रसिद्ध पिंडी क्रिकेट स्टेडियमवर सुरु झाला, परंतु काही तासांतच पाकिस्तानमधील सुरक्षा परिस्थिती पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. रावळपिंडीपासून सुमारे 190 किमी अंतरावर असलेल्या पेशावरमध्ये (Peshawar) भीषण बॉम्बस्फोट (Peshawar Bomb Blast) झाला, ज्यामध्ये सुमारे 50 जणांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या पाकिस्तानमधील उपस्थितीवर प्रश्न उठत आहे.

पाकिस्तानी मीडियाच्या मते, पेशावरमध्ये शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी मशिदीमध्ये मोठा बॉम्बस्फोट झाला, ज्यामध्ये सुमारे 30 लोक ठार झाले, तर 50 हून अधिक लोक जखमी झाले. आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. पेशावर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन हल्लेखोरांनी मशिदीत घुसण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना अडवल्यावर त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. यामध्ये एका पोलिसाचा मृत्यू झाला, तर दुसरा जखमी झाला. त्यानंतर काही वेळातच मशिदीत स्फोट झाला.

शिवाय, या स्फोटामुळे पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया मालिका सुरु ठेवण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ऑस्ट्रेलियन संघ 1998 नंतर प्रथमच पाकिस्तानात आला आहे, जिथे त्यांना 3 कसोटी सामने, 3 वनडे आणि 1 टी-20 सामना खेळायचा आहे. संपूर्ण दौऱ्यातील पहिल्या कसोटीचा शुक्रवार हा पहिला दिवस होता. पहिल्याच दिवशी रावळपिंडीपासून सुमारे 190 किमी अंतरावर झालेल्या या स्फोटामुळे ऑस्ट्रेलियन संघ हा दौरा सुरु ठेवणार की परत जाणार, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sex Racket Bust: वास्को पोलिसांची दाबोळीतील 'स्पा'वर छापेमारी, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत सहा महिलांची सुटका; दोघे अटकेत

Krishnaji Kank: फोंडा किल्ल्यासाठी शंभूराजे दौडत आले, गोव्याचा गव्हर्नर पोर्तुगीज सैन्यासह पळत सुटला; शूरवीर कृष्णाजी कंकांची कथा

Terrorists Attack in India: हाफिज सईदकडून भारतावर हल्ल्याचा कट, बांगलादेशला 'लाँचपॅड' बनवण्याची तयारी; दहशतवादी सैफुल्लाहचा चिथावणीखोर VIDE0 व्हायरल

Ironman 70.3 Goa India: गोवा 'आयर्नमॅन' स्पर्धेत विदेशी खेळाडूंनी मारली बाजी! भारतीय एअर फोर्सनेही नोंदवला तिहेरी विजय

Pooja Naik: “संबंधितांची नावे उघड करावी, कोणाचीही गय करणार नाही”, पूजा नाईक प्रकरणी मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका

SCROLL FOR NEXT