Hardik Pandya Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2022: हार्दिक पांड्याच्या संघाचे नाव जाहीर

IPL 2022 मध्ये दोन नवे संघ सामील झाले आहेत. त्यापैकी एक असलेल्या अहमदाबाद फ्रँचायझीने आपल्या संघाचे नाव जाहीर केले आहे. या संघाचे नाव गुजरात टायटन्स असे जाहीर करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

IPL 2022 मध्ये दोन नवे संघ सामील झाले आहेत. त्यापैकी एक असलेल्या अहमदाबाद फ्रँचायझीने आपल्या संघाचे नाव जाहीर केले आहे. या संघाचे नाव गुजरात टायटन्स (Gujarat Titans) असे जाहीर करण्यात आले आहे. स्टार स्पोर्ट्सवर 9 फेब्रुवारी रोजी संघाचे नाव जाहीर करण्यात आले. अहमदाबादचा संघ प्रथमच आयपीएलमध्ये (IPL) सामील होत आहे. यापूर्वी अशा बातम्या आल्या होत्या की, या संघाचे नाव अहमदाबाद टायटन्स घोषित होणार होते. परंतु आता योग्य नाव समोर आले आहे. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) या संघाचा कर्णधार आहे. सीव्हीसी कॅपिटलकडे अहमदाबाद फ्रँचायझी (Ahmedabad Franchise) आहे. (The Ahmedabad Franchise Team Has Been Named Gujarat Titans)

दरम्यान, अहमदाबाद व्यतिरिक्त, लखनौ फ्रँचायझीने (Lucknow Super Giants) देखील आयपीएल 2022 मध्ये प्रवेश केला आहे. या फ्रँचायझीने लखनौ सुपर जायंट्स हे नाव निवडले आहे. अहमदाबाद फ्रँचायझीने IPL 2022 च्या लिलावापूर्वी हार्दिक पांड्या, राशिद खान (Rashid Khan) आणि शुभमन गिल (Shubhaman Gill) यांना कायम ठेवले आहे. हार्दिकला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. इंग्लंडच्या विक्रम सोलंकीला क्रिकेटचे संचालक बनवण्यात आले आहे, तर आशिष नेहराला (Ashish Nehra) मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. तसेच गॅरी कर्स्टन हे संघाचे मार्गदर्शक आणि फलंदाजी प्रशिक्षक आहेत. सीव्हीसी कॅपिटलने अहमदाबाद फ्रँचायझी 5625 कोटी रुपयांना विकत घेतली होती.

गुजरात लायन्स संघ दोन मोसमात

याआधी गुजरातचा संघ 2016 आणि 2017 मध्ये आयपीएलमध्ये खेळला होता. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) निलंबनानंतर पुणे आणि राजकोटच्या फ्रँचायझींमध्ये प्रवेश करण्यात आला. त्यावेळी राजकोट फ्रँचायझीने स्वतःचे नाव गुजरात लायन्स असे ठेवले होते. या संघाचा कर्णधार सुरेश रैना होता. तसेच रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो आणि इशान किशन या खेळाडूंचा त्यात सहभाग होता. हा संघ आयपीएल 2016 च्या प्ले ऑफमध्ये पोहोचला होता.

लखनौचा संघही आयपीएलचा भाग झाला

अहमदाबाद व्यतिरिक्त, लखनौ फ्रँचायझी देखील आयपीएलचा एक भाग बनले आहे. त्याचे मालक संजीव गोयंका यांच्याकडे आहेत. या फ्रँचायझीने लखनौ सुपर जायंट्स असे नाव दिले आहे. यासाठी त्यांनी 7090 कोटी रुपये खर्च केले. या संघात केएल राहुल, मार्कस स्टॉइनिस आणि रवी बिश्नोई यांसारखे दिग्गज खेळाडू आहेत. गौतम गंभीर हा या संघाचा मार्गदर्शक आहे, तर अँडी फ्लॉवर आणि विजय दहिया हे कोचिंग स्टाफचा भाग आहेत. विशेष म्हणजे 2016-2017 मध्ये संजीव गोयंका देखील आयपीएलचा भाग होता. रायझिंग पुणे सुपरजायंटचे मालक होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

..तांबडया समुद्रातून बेट मागे टाकल्यावर बोट 'सुएझ कालव्या'त शिरली! गोव्यासाठी लढलेल्या वीरांच्या कारावासातल्या भयाण आठवणी

U19 Asia Cup 2025: भारताचा श्रीलंकेला विजयाचा 'धोबीपछाड'; फायनलमध्ये रंगणार भारत-पाक हायव्होल्टेज थरार! VIDEO

Rahu Gemstone: राहुची महादशा अन् गोमेद रत्नाचा चमत्कार! 'या' 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार; जाणून घ्या फायदे आणि महत्त्वाचे नियम

VIDEO: गोव्यात 'स्पा' सेंटरच्या नावाखाली पर्यटकांची लूट! कळंगुट, बागा किनाऱ्यावर ट्रान्सजेंडरचा वावर, महिलेने उघड केला धक्कादायक प्रकार

Jeffrey Epstein Files: जेफ्री एप्सटीन फाइल्सचा धमाका! डोनाल्ड ट्रम्प, बिल गेट्स यांच्यासह बड्या हस्तींचे फोटो व्हायरल; 18 वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला VIDEO

SCROLL FOR NEXT