Kuchbihar Trophy Cricket Tournament Dainik Gomantak
क्रीडा

गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंची कसोटी

कुचबिहार करंडक क्रिकेट: सूरत येथे महाराष्ट्राविरुद्ध पहिली लढत, गोव्याचे (Goa) 19 वर्षांखालील क्रिकेटपटू (Cricket) सुमारे दीड वर्षांनंतर चार दिवसीय सामन्यांची स्पर्धा खेळण्यासाठी मैदानावर उतरत आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्याचे (Goa) 19 वर्षांखालील क्रिकेटपटू सुमारे दीड वर्षांनंतर चार दिवसीय सामन्यांची स्पर्धा खेळण्यासाठी मैदानावर उतरत आहेत. कुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेच्या (Kuchbihar Trophy Cricket Tournament) एलिट क गटात त्यांना प्रत्येक लढतीत कठीण परीक्षा द्यावी लागण्याचे संकेत आहेत.

गुजरातमधील सूरत (Surat) येथे महिनाभराच्या कालावधीत गोव्याचा संघ पाच सामने खेळेल. पहिला सामना सोमवारपासून महाराष्ट्राविरुद्ध खेळला जाईल. त्यानंतर 6 डिसेंबरपासून तमिळनाडूविरुद्ध, 13 डिसेंबरपासून हिमाचलविरुद्ध, 20 डिसेंबरपासून छत्तीसगडविरुद्ध, तर 27 डिसेंबरपासून मध्य प्रदेशविरुद्ध सामना होईल.

कोरोना विषाणू (Covid 19) महामारीमुळे ज्युनियर क्रिकेटपटूंसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ 2020-21 मोसमात एकही स्पर्धा घेऊ शकले नाही. त्यापूर्वी गोव्याचा संघ 2019-20 मोसमातील कुचबिहार करंडक स्पर्धेत प्लेट गटात खेळला होता. या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये गोव्याचा 19 वर्षांखालील संघ विनू मांकड करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत खेळला. पाचपैकी एका लढतीत गोव्याने विजय नोंदविला, दोन लढतीत पराभव पत्करावा लागला, तर दोन लढतींचा पावसाचा फटका बसला.

'आमचे खेळाडू अंदाजे दीड वर्षांत एकही सामना खेळले नाहीत. त्यांची तंदुरूस्ती पातळी खूपच खालावली आहे. काही खेळाडू १६ वर्षांखालील वयोमर्यादा ओलांडल्यानंतर दीर्घ कालावधीत स्पर्धा न खेळता थेट १९ वर्षांखालील संघात आले आहेत. या खेळाडूंसाठी कौशल्य आणि तंदुरुस्तीच्या पातळीवर हा बदल खूपच खडतर ठरू शकतो. संघर्षमय कालखंड असला, तरी खेळाडूंनी मेहनतीस प्राधान्य दिले ही कौतुकास्पद बाब आहे,' असे सूरतला रवाना होण्यापूर्वी गोव्याचे मुख्य प्रशिक्षक राजेश कामत यांनी सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jijabai Karandak: गोव्याच्या महिला संघाचा सलग 3 रा पराभव! तमिळनाडूविरुद्ध हाराकिरी; स्पर्धेतील आव्हान संपुष्टात

Atal Setu: अंधार, संशयास्पद हालचाली; अटल सेतूखाली नेमके चालते काय? म्हापसा चोरीतले वाहन सापडल्याने विषय ऐरणीवर..

अग्रलेख: रामा काणकोणकर यांना भररस्त्यात मारहाण, सशस्त्र दरोड्यांचे सत्र; यालाच अराजक म्हणतात

Goa Congress: अमित पाटकरांच्या जागी नवा प्रदेशाध्यक्ष? दिल्लीत गोव्यातील सर्व काँग्रेस नेत्यांची महत्वाची बैठक

Human Animal Conflict: 'ओंकार हत्ती' पिके नष्ट करण्यासाठीचे आला का? जंगलातील अन्नसाखळी मोडली त्याचे काय?

SCROLL FOR NEXT