Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

...आता टीम इंडिया उध्दवस्त होईल, दिग्गजाने व्यक्त केली भिती

विराट कोहलीला (Virat Kohli) वनडेच्या कर्णधारपदावरुन हटवल्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे.

दैनिक गोमन्तक

विराट कोहलीला (Virat Kohli) वनडेच्या कर्णधारपदावरुन हटवल्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. काही माजी क्रिकेटपटू याला योग्य निर्णय म्हणत आहेत, तर काहींच्या मते विराट कोहलीला हटवणे हा योग्य निर्णय नसल्याचे म्हणत आहेत. 1983 मध्ये भारताला विश्वचषक जिंकून देणारा माजी वेगवान गोलंदाज मदन लाल (Madan Lal) यानेही विराट कोहलीकडून एकदिवसीय कर्णधारपद हटविण्यावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संघ बनवणे खूप अवघड आहे, परंतु संघ तोडणे खूप सोपे असल्याचे त्याने म्हटले.

हिंदुस्तान टाईम्सशी खास संवाद साधताना मदन लाल म्हणाले, 'निवडकर्त्यांचा विचार काय आहे हे मला माहीत नाही. विराट कोहली निकाल देत होता मग त्याला का काढले? त्याने टी-20 क्रिकेटमधून कर्णधारपद का सोडले हे मी समजू शकतो. विराटला एकदिवसीय आणि कसोटीवर लक्ष केंद्रित करायचे होते. परंतु तो यशस्वी होत असतानाही त्याला कर्णधारपदावरुन दूर करणे माझ्या आकलनापलीकडचे आहे.

विराटला 2023 च्या विश्वचषकापर्यंत संधी मिळायला हवी होती

मदन लाल म्हणाले की, विराट कोहली 2023 विश्वचषकापर्यंत कर्णधारपदासाठी पात्र होता. मदन लाल पुढे म्हणाले, 'मला वाटले होते की, विराट कोहली 2023 विश्वचषकापर्यंत कर्णधार असेल. संघ बनवणे खूप अवघड आहे पण तो तोडणे सोपे आहे. मदनलाल पुढे म्हणाले, 'मला समजले नाही की गोंधळ कुठे निर्माण झाला असेल. प्रत्येक कर्णधाराची कॅप्टन्सी करण्याची पद्धत वेगळी असते. कसोटी आणि मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये वेगळे कर्णधारपद आहे. विराट-रोहितची स्वतःची शैली आहे. धोनीची शैली वेगळी होती. आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर केवळ प्रोफेशनल क्रिकेटबद्दल बोलले पाहिजे, बाकी काही नाही.

दरम्यान, बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी खुलासा केला होता की, बीसीसीआयला हे नको असताना विराट कोहलीने स्वतः टी-20 कर्णधारपद सोडले होते. यानंतर बोर्डाने त्याला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन काढून टाकण्याचा निर्णय घेतला, कारण त्याला पांढऱ्या चेंडूच्या खेळासाठी एकच कर्णधार हवा होता. जो आता रोहित शर्मा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: प्रथमेश गावडे प्रकरणी तनिष्का चव्हाण आणि प्रीती चव्हाण यांना सशर्त जामीन मंजूर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Vegetable: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दर वाढले; अन्य भाज्यांचे दर स्थिर

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT