Team India Dainik Gomantak
क्रीडा

Team India: या भारतीय महिला खेळाडूचे लुटले दागिने

Indian Women Cricketer: भारतीय संघाने नुकत्याच संपलेल्या इंग्लंड दौऱ्यावर प्रथमच एकदिवसीय मालिकेत 3-0 असा शानदार विजय नोंदवला.

दैनिक गोमन्तक

Taniya Bhatia Sensational Claims: टीम इंडियाची स्टार यष्टिरक्षक फलंदाज तानिया भाटियाने सोमवारी दावा केला की, लंडनमधील मॅरियट हॉटेलमध्ये महिला संघाच्या मुक्कामादरम्यान रोख रक्कम, कार्ड आणि दागिन्यांसह महत्त्वाचे सामान लुटले गेले. भारतीय संघाने नुकत्याच संपलेल्या इंग्लंड दौऱ्यावर प्रथमच एकदिवसीय मालिकेत 3-0 असा शानदार विजय नोंदवला. या मालिकेतील शेवटचा सामना शनिवारी झाला.

तानियाने ट्विटरवर माहिती दिली

तानिया भाटियाने (Tania Bhatia) सोशल मीडियावर दावा केला आहे की, 'लंडनमधील (London) मॅरियट हॉटेलमध्ये महिला संघाच्या मुक्कामादरम्यान मला लुटण्यात आले. वास्तव्यादरम्यान कोणीतरी माझ्या खोलीत आले आणि त्याने रोकड, कार्ड, घड्याळे आणि दागिने असलेली माझी बॅग चोरुन नेली.'

इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडे चौकशीची मागणी

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या (ECB) ट्विटर हँडलला टॅग करत तिने आणखी एका ट्विटमध्ये लिहिले की, 'या प्रकरणाची चौकशी आणि निराकरणाची आशा आहे. ईसीबीच्या पसंतीच्या हॉटेल पार्टनरमध्ये सुरक्षिततेचा अभाव आश्चर्यकारक आहे. ते यासंबंधी दखल घेतील अशी आशा आहे.'

दरम्यान, तानियाच्या तक्रारीवर हॉटेलने आपल्या ट्विटर हँडलवरुन प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटमध्ये ते म्हणाले की, 'तानिया, आम्हाला हे ऐकून खूप वाईट वाटले. कृपया तुमचे नाव, पत्ता ईमेलद्वारे आम्हाला पाठवा. जेणेकरुन आम्ही त्याची पडताळणी करु शकू.' भारताने 10 ते 24 सप्टेंबर दरम्यान इंग्लंडमध्ये (England) तीन टी-20 आणि अनेक एकदिवसीय सामने खेळले. तानिया भारतीय महिला वनडे संघाचा भाग होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: संपूर्ण गोव्याचे, गोवेकरांच्या अस्तित्वाचे, मुलाबाळांच्या भवितव्याचे प्रश्न कोण विचारणार?

Weekly Horoscope: जाणून घ्या येणाऱ्या आठवड्यातील ग्रह-नक्षत्रांची स्थिती; काही राशींना शुभ, तर काहींना सतर्कतेचा इशारा

Mapusa Fire Incident: म्हापशात आगीचे थैमान, शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना; 3 लाखांचे नुकसान

Goa Live News: मॅन्ग्रोव्ह डे निमित्त, सरकारी हायस्कूल मर्सेसने 'मातृशक्ती क्लब'चे केले उद्घाटन

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

SCROLL FOR NEXT