Ravindra Jadeja Dainik Gomantak
क्रीडा

Team India: हा भारतीय खेळाडू आहे 100 कोटींहून अधिक रुपयांचा मालक, जाणून घ्या

Indian Cricketer's Lifestyle: टीम इंडियाचे खेळाडू त्यांच्या लग्झरी लाइफस्टाइलसाठी ओळखले जातात.

दैनिक गोमन्तक

Indian Cricketer's Lifestyle: टीम इंडियाचे खेळाडू त्यांच्या लग्झरी लाइफस्टाइलसाठी ओळखले जातात. टीम इंडियाचा प्रमुख खेळाडू रवींद्र जडेजा हा जगातील स्टार अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणला जातो, ज्यामुळे त्याची ब्रँड व्हॅल्यू खूप जास्त आहे. रवींद्र जडेजा राजेशाही जीवन जगण्यासाठी ओळखला जातो. या बातमीत आम्ही तुम्हाला त्याच्या जीवनशैली आणि संपत्तीबद्दल सांगणार आहोत. 33 वर्षीय अष्टपैलू रवींद्र जडेजाचा जन्म 6 डिसेंबर 1988 रोजी जामनगरमध्ये झाला. वृत्तानुसार, रवींद्र जडेजाची एकूण संपत्ती 13 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (सुमारे 100 कोटी रुपये) एवढी आहे.

दरम्यान, रवींद्र जडेजाचे (Ravindra Jadeja) बालपण खूप हालाखीत गेले. जडेजाचे वडील जामनगरमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचे आणि आई हॉस्पिटलमध्ये परिचारिका होती. दुसरीकडे, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधून सर्वाधिक कमाई करतो. आयपीएल 2022 मध्ये त्याला चेन्नई संघाने 16 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले होते.

तसेच, जडेजाचे घर गुजरातमधील (Gujarat) जामनगरमध्ये आहे. त्याचा बंगला राजवाड्यापेक्षा कमी नाही. जडेजा अनेकदा आपल्या घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. जडेजाचेही फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसचे नाव 'मि. जड्डू फार्म हाऊस', असे आहे. जडेजाने 2005 मध्ये आईला एका अपघातात गमावले. त्यानंतर जडेजाने पुन्हा क्रिकेटला सुरुवात केली.

शिवाय, रवींद्र जडेजाची आतापर्यंतची कारकीर्द शानदार राहिली आहे. जडेजाने टीम इंडियासाठी आतापर्यंत 60 कसोटी, 171 एकदिवसीय आणि 64 टी-20 सामने खेळले आहेत. रवींद्र जडेजा सध्या दुखापतीमुळे टीम इंडियातून (Team India) बाहेर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND VS NZ: किवींचा धुव्वा उडवण्यासाठी 'रो-को' सज्ज! कधी आणि कुठे पाहता येईल पहिला एकदिवसीय सामना? जाणून घ्या

'कुशावती' जिल्ह्याचा उदय! जिल्हा मुख्यालयाचा मान मिळाल्याने केपेवासियांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

विदेशी माणसांप्रमाणेच विदेशी झाडेही आक्रमक! आपली जैवविविधता वाचवण्यासाठी 'देशी' वृक्षांची गरज

VIDEO: अर्शदीप सिंगच्या रन-अपची विराटनं उडवली खिल्ली! रोहितलाही हसू आवरले नाही; सराव सत्रातील व्हिडीओ व्हायरल

Gauri Achari Murder Case: गौरी आचारी खून प्रकरण! गौरव बिद्रेचा चौथ्यांदा जामीन अर्ज फेटाळला, विलंब होतो म्हणून जामीन मिळणार नाही

SCROLL FOR NEXT