Indian Women Team  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: भारतीय महिला संघाने वानखेडेवर रचला इतिहास, ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली पहिली कसोटी!

India Women vs Australia Women: भारतीय महिला संघाने एकमेव कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 8 गडी राखून पराभव करत इतिहास रचला.

Manish Jadhav

India Women vs Australia Women: भारतीय महिला संघाने एकमेव कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 8 गडी राखून पराभव करत इतिहास रचला. महिला संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमधील हा पहिला विजय आहे. याआधी दोन्ही संघांमध्ये एकूण 11 सामने खेळले गेले ज्यात कांगारु संघ 4 सामने जिंकण्यात यशस्वी ठरला, तर 6 सामने अनिर्णित राहिले. हा कसोटी सामना जिंकण्यासाठी भारतासमोर केवळ 75 धावांचे लक्ष्य होते. स्मृती मंदानाच्या 38 धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने मोठा विजय नोंदवला. हा विजय दीर्घकाळ स्मरणात राहील.

दरम्यान, चौथ्या दिवसाची सुरुवात ऑस्ट्रेलियाने 5 विकेट गमावून 233 धावा करुन केली. उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर भारताने पुढील 28 धावांत ऑस्ट्रेलियाचा डाव 261 धावांवर आटोपला. 75 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने 4 धावांवर शफाली वर्माच्या रुपाने पहिली विकेट गमावली. ती किम गर्थची बळी ठरली. यानंतर ऋचा घोष 13 धावांवर बाद झाली. अखेरीस मंदानासह जेमिमाह रॉड्रिग्स 12 धावा करुन नाबाद राहिली.

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात स्नेह राणाने 4 तर राजेश्वरी गायकवाड आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने प्रत्येकी 2 बळी घेत कांगारुंना गुडघे टेकण्यास भाग पाडले. चौथ्या दिवशी पूजा वस्त्राकरने 7 धावांवर अश्ले गार्डनरला बाद करुन भारताला दिवसातील पहिली विकेट मिळवून दिली. यानंतर स्नेह राणाने दोन चेंडूंत दोन विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा मोठा धक्का दिला. शेवटच्या दोन विकेट राजेश्वरी गायकवाडने घेतल्या. तिने किम गर्थ आणि जोनासेन यांना आपले बळी बनवलं.

दरम्यान, तिसऱ्या दिवसअखेर पाहुण्या संघाने दुसऱ्या डावात 5 गडी गमावून 233 धावा केल्या होत्या आणि 46 धावांची आघाडी घेतली होती. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या डावात 219 धावांवर सर्वबाद झाला होता. ताहलिया मॅकग्रा ही अर्धशतक झळकावणारी एकमेव फलंदाज होती. भारताकडून पूजा वस्त्राकरने 4 आणि स्नेह राणाने 3 बळी घेतले. दिप्ती शर्मानेही दोन विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाच्या 219 धावांसमोर भारताने स्मृती मंदाना (74), ऋचा घोष (52), जेमिमाह रॉड्रिग्स (73) आणि दिप्ती शर्मा (78) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पहिल्या डावात 406 धावा केल्या होत्या. पहिल्या डावानंतर भारताने पाहुण्यांवर 187 धावांची आघाडी घेतली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT