Team India Players kicked off practice sessions for WTC 2023 final: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धचा अंतिम टप्पा भारतात पार पडत असताना दुसरीकडे भारतीय क्रिकेट संघाची आगामी टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची तयारी सुरू झाली आहे.
आयपीएल 2023 मधून बाहेर पडलेल्या संघातील खेळाडू जे टेस्ट चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाचे भाग आहेत, ते खेळाडू काही दिवसांपूर्वीच इंग्लंडला पोहोचले आहेत. यामध्ये विराट कोहली, आर अश्विन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर अशा काही खेळाडूंचा समावेश आहे.
टेस्ट चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना 7 ते 11 जून दरम्यान भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पार पडणार आहे. हा सामना इंग्लंडमधील द ओव्हल स्टेडियममध्ये होणार आहे.
या सामन्याच्या तयारीसाठीच भारतीय संघाची एक तुकडी सपोर्ट स्टाफसह यापूर्वी इंग्लंडला गेली असून त्यांचा सरावही सुरू झाला आहे. नुकताच त्यांच्या सरावादरम्यानचा एक व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
या व्हिडिओमध्ये दिसते की शार्दुल ठाकूर, उमेश यादव आणि अक्षर पटेल हे खेळाडू भारतीय संघातील इतर काही सदस्य चेंडू एकमेकांकडे टाकत एक खेळ खेळताना दिसत आहेत. या व्हिडिओवर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. दरम्यान भारतीय संघातील उर्वरित खेळाडू आयपीएल 2023 नंतर इंग्लंडला पोहचणार आहेत.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे 7 ते 11 जून दरम्यान होणाऱ्या टेस्ट चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी 12 जून हा राखीव दिवस असणार आहे.
दरम्यान कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचे हे दुसरे पर्व आहे. यापूर्वी 2021 मध्ये 18 ते 23 जून दरम्यान पहिल्या पर्वाचा अंतिम सामना पार पडला होता. त्यावेळी न्यूझीलंडने भारताला राखीव दिवशीच 8 विकेट्सने पराभूत करत कसोटीतील पहिला विश्वविजेता संघ होण्याचा मान मिळवला होता.
असे आहेत टेस्ट चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघ -
भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन (यष्टीरक्षक).
राखीव खेळाडू - ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार आणि सुर्यकुमार यादव
ऑस्ट्रेलिया संघ - पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलंड, ऍलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅब्युशेन, नॅथन लायन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार) , मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.