Team India X/BCCI
क्रीडा

IND vs AFG: 'पोहे आणि आवेश खान', दुसऱ्या T20I साठी इंदूरला पोहचताना टीम इंडियाला काय आठवलं, पाहा Video

Team India reached Indore: अफगाणिस्तानविरुद्ध रविवारी दुसरा टी20 सामना होणार आहे, या सामन्यासाठी भारतीय संघ इंदूरला पोहचला आहे.

Pranali Kodre

Team India Reached Indore:

भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात सध्या तीन सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना इंदूरमधील होळकर क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. त्यासाठी भारतीय संघ इंदूरला पोहचला आहे.

दरम्यान, इंदूरला प्रवास करत असताना भारतीय संघातील सदस्यांनी ते या शहराबद्दल काय विचार करतात, हे सांगितले आहे. त्याचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये सुरुवातीला चायनामन गोलंदाज कुलदीप यादव म्हणाला, 'इंदूरमध्ये अनेक क्रिकेटच्या आठवणी आहेत. पण मी फूड आणि सराफा मार्केटबद्दल विचार करत आहे.' तसेच भारताचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप म्हणाले, 'इंदूर म्हटलं की मी फक्त पोहे इतकेच म्हणू शकेल.'

त्याचबरोबर संजू सॅमसनने सांगितले इंदूर म्हणजे आवेश खान आणि त्याचे मजेशीर बोलणे. तो म्हणाला, 'इंदूरचे लोकं खूप मजेशीर आहेत, ते खूप सहज जोक करू शकतात. त्यातील एक आवेश खानही आहे.'

याशिवाय शुभमन गिलने होळकर क्रिकेट स्टेडियममधील ड्रेसिंग रुमला राहुल द्रविडचे नाव दिले असल्याची आठवण करून दिली. तसेच वॉशिंग्टन सुंदर आणि व्हिडिओ व डेटा ऍनालिस्टला उज्जैनमधील महाकालेश्वर मंदीर आठवले. तसेच अनेकांनी इंदूरबद्दल बोलताना पोहे आणि आवेश खान यांचे नाव सर्वाधिक घेतले.

अखेरीस भारतीय संघाचे प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी म्हटले की 'माझ्यासाठी इंदूर म्हणजे फलंदाजीसाठी चांगली खेळपट्टी. येथे मोठ्या धावसंख्येचे सामने होतात.'

भारताकडे मालिका विजयाची संधी

दरम्यान, अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेतील मोहालीमध्ये झालेला पहिला सामना भारताने जिंकला आहे. त्यामुळे भारताने 1-0 अशी आघाडी घेतलेली आहे.

त्यामुळे जर भारताने दुसरा सामना जिंकला, तर मालिकाही खिशात घालेल. पण जर दुसरा सामना अफगाणिस्तानने जिंकला, तर मालिकेत बरोबरी होईल आणि तिसरा टी20 सामना निर्णायक ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

SCROLL FOR NEXT