India vs Australia 1st Test, Rahul Dravid On Pitch: भारतीय संघ उद्यापासून म्हणजेच गुरुवार 9 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेतील पहिला कसोटी सामना नागपुरातील व्हीसीए स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी केवळ दोन्ही संघांचे खेळाडूच तयार नाहीत तर चाहतेही 'ऑल सेट मोड'मध्ये आहेत.
दरम्यान, टीम इंडियाचे (Team India) मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याबाबत एक बातमी समोर आली आहे, ज्यावरुन असे म्हणता येईल की, नागपूर कसोटी सामन्यात भारताचे पारडे जड राहू शकते.
भारतीय संघ व्यवस्थापनाने नागपुरातील पहिल्या कसोटीसाठी ट्रॅक बदलण्याची मागणी मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघ 9 फेब्रुवारीपासून जामठा येथील व्हीसीए स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी ही मालिका किती महत्त्वाची आहे, याची जाणीव मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनाही आहे.
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी जामठा पिच क्युरेटर अभिजित पिप्रोड यांच्याशी दीर्घ संवाद साधला. यजमान संघ गेल्या काही दिवसांपासून मैदानावर सराव करत आहे. यानंतर द्रविड यांनी ट्रॅक बदलण्याची मागणी केली.
एका दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड नागपुरातील ट्रॅकंबंधी नाराज होते. भारतीय संघ गेल्या काही दिवसांपासून नागपूरच्या व्हीसीए स्टेडियमवर सेंटर विकेटवर सराव करत आहे. आता, द्रविड यांनी कसोटीपूर्वी ट्रॅक बदलण्यास सांगितले.
यजमान संघाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अधिकारी आणि खेळपट्टीचे क्युरेटर आता चोवीस तास काम करत आहेत. आधी नोंदवल्याप्रमाणे, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी खेळपट्ट्या संतुलित आणि 5 दिवसांचे कसोटी क्रिकेट सुनिश्चित करण्यासाठी तयार करण्यात आल्या होत्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.