Rohit Sharma | Suryakumar Yadav Dainik Gomantak
क्रीडा

Suryakumar Yadav: 'टीम मॅनेजमेंटने पाठिंबा दिला, पण..', सूर्याच्या वनडे फॉर्मबद्दल कॅप्टन रोहित दिले उत्तर

Pranali Kodre

Rohit Sharma on Suryakumar Yadav form in ODI Cricket:

भारताचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव गेल्या काही वर्षांपासून टी20 क्रिकेटचे मैदान गाजवत आहे. त्याची टी20 क्रिकेटमधील कामगिरीही शानदार राहिली आहे.

त्याने नुकतेच 8 ऑगस्टला वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या टी20 सामन्यात 44 चेंडूत 83 धावांची खेळी करत भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होता. मात्र, त्याची वनडेतील आकडेवारी चिंताजनक आहे. त्याला वनडे क्रिकेटमध्ये सातत्य राखता आलेले नाही.

त्याचमुळे वनडे प्रकारात खेळण्यात येणाऱ्या आगामी आशिया चषक आणि वर्ल्डकप स्पर्धेसाठी त्याच्या स्थानावर प्रश्नचिन्ह आहे. याबद्दल रोहित शर्माने त्याची प्रतिक्रिया दिली आहे. रोहितच्या मते सूर्यकुमार यासाठी मेहनत घेत आहे.

मुंबईत झालेल्या ला लीगा कार्यक्रमात बोलताना रोहित म्हणाला, 'टी20 क्रिकेट प्रकारात त्याच्या क्षमतेवर कोणतीच शंका नाही. पण वनडे क्रिकेटमध्ये आव्हान वेगळे असते. तो खरंच कठोर मेहनत घेत आहे.'

'तो वनडे क्रिकेटचा बराच अनुभव असलेल्या खेळाडूंचीही चर्चा करत आहे की दृष्टीकोन आणि मासिकता कशी हवी. सूर्या संघाचा भागही आहे. संघव्यवस्थापनाने त्याला वनडेत चांगले खेळेल, म्हणून पाठिंबाही दिला आहे, पण संधी मिळाल्यानंतरही अद्याप तो जुळवून घेऊ शकलेला नाही.'

रोहितने सूर्यकुमारच्या आयपीएल 2023 स्पर्धेतील कामगिरीकडेही लक्ष वेधले. यास्पर्धेत सूर्यकुमारची सुरुवातीची कामगिरी फारशी चांगली झाली नव्हती. मात्र, नंतर त्याने शानदार खेळ दाखवला.

रोहित म्हणाला, 'तो वेगळ्या प्रकारचा खेळाडू आहे, तुम्हाला तो ज्याप्रकारे फलंदाजी करतो, त्यानुसार खेळण्याचे त्याला स्वातंत्र्य द्यावे लागते. तुम्ही त्याल असे सांगू शकत नाही की १०० चेंडूंचा सामना कर आणि 50 धावा कर.'

'त्याच्यासारख्या फलंदाजांना ज्यादाच्या संधी देणे गरजेचे असते, ज्यामुळे त्यांना आत्मविश्वास मिळेल. त्याने यावर्षी ज्याप्रमाणे आयपीएलची सुरुवात केली होती, त्याला पहिल्या 4-5 सामन्यांमध्ये अधिक धावा करता आल्या नव्हत्या, पण त्याने नंतर त्याने शानदार खेळ केला.'

रोहितने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी20 मध्ये केलेल्या कामगिरीचे कौतुक करताना वनडेतही तो अशी कामगिरी करेल, अशी आशा व्यक्त केली आहे.

रोहित म्हणाला, 'त्याच्यासारख्या खेळाडूसाठी अशी परिस्थिती असायला हवी की तुम्ही 2-3 सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली नाही तरी चालेल, पण जेव्हा तो लयीत असेल, तेव्हा आम्हाला खात्री असेल की तो सामना जिंकवूनच देईल. हेच त्याने तिसऱ्या टी20 सामन्यामध्ये केले. वरच्या फळीतील फलंदाज बाद झाले होते आणि सुर्याने जाऊन तशी फलंदाजी केली.'

सूर्यकुमारने वनडे क्रिकेटमध्ये 26 सामने खेळले आहेत. यात त्याने 24.33 च्या सरासरीने 2 अर्धशतकांसह 511 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेतील तिन्ही सामन्यात सूर्यकुमार सलग शुन्यावर बाद झाला होता.

तसेच आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये त्याने 51 सामन्यांमध्ये 45.64 च्या सरासरीने 1780 धावा केल्या आहेत. यात 3 शतकांचा आणि 14 अर्धशतके केली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

Goa Taxi: ..हे तर सरकारचे कारस्थान! जीएसटी नोटीसींवरुन टॅक्सीमालक नाराज

Goa University: विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव! गोवा फॉरवर्डचा हल्लाबोल; शिष्‍टमंडळाशी चर्चा होणार

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

SCROLL FOR NEXT