Team India Captain Rohit Sharma  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs ENG: ''कोणासाठीही दारे बंद नाहीत...'', सीनियर खेळाडूंच्या भविष्यावर कर्णधार रोहित शर्मा स्पष्टच बोलला

IND vs ENG 1st Test: टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे गेल्या काही काळापासून भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी झगडत आहेत.

Manish Jadhav

IND vs ENG 1st Test: टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे गेल्या काही काळापासून भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी झगडत आहेत. इंग्लंडविरुद्ध उद्यापासून खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत या दोन्ही खेळाडूंची निवड झालेली नाही. या मालिकेतील सुरुवातीच्या सामन्यांमधून विराट कोहली बाहेर असताना या दिग्गजांपैकी एकाचा संघात समावेश होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती, पण तसे झाले नाही. आता कर्णधार रोहितने असे वक्तव्य केले की, ज्यानंतर या दोन्ही खेळाडूंची कारकीर्द जवळपास संपल्याचे मानले जात आहे.

आता पुजारा-रहाणेच्या करिअरचे काय होणार?

दरम्यान, रोहितने संकते दिले की, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे सारख्या दिग्गजांची कसोटी कारकीर्द जवळपास संपली आहे, कारण आता तरुण खेळाडूंना अधिक संधी देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांपासून दूर राहण्याच्या निर्णयानंतर पुजारा किंवा रहाणेला संधी दिली जाईल अशी शक्यता होती पण अजित आगरकरच्या अध्यक्षतेखालील निवड समिती मागे वळून पाहण्याच्या मनस्थितीत नाही असे दिसते. कोहलीच्या जागी युवा खेळाडू रजत पाटीदारला संधी देण्यात आली आहे.

रोहितच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली

या निर्णयाबाबत रोहित म्हणाला की, सुरुवातीच्या कसोटीपूर्वी आम्ही सीनियर खेळाडूंना संघात आणण्याचा विचार केला होता पण मग युवा खेळाडूंना संधी कधी मिळणार. याचाही आम्ही विचार केला. मात्र, सीनियर खेळाडूंना बाहेर ठेवण्याचा निर्णय सोपा नव्हता, असेही तो पुढे म्हणाला. रहाणे भारताकडून शेवटचा 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळला होता, तर पुजाराला गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर वगळण्यात आले होते.

रोहित पुढे म्हणाला की, ''सीनियर खेळाडूंना वगळण्याचा निर्णय सोपा नाही. त्यांनी इतक्या धावा केल्या आहेत, इतके सामने जिंकले आणि त्यांच्याकडे इतका अनुभव आहे की त्याकडे दुर्लक्ष करणेही कठीण आहे. पण काही वेळा नवीन खेळाडूंना संधी द्यावी लागते. त्यांना अनुकूल परिस्थितीत संधी दिल्यानंतरच त्यांनी परदेशी भूमीवर खेळायला हवे. तरुणांना संधी देणे महत्त्वाचे आहे, असे मला वाटते.'' मात्र, कोणासाठीही दरवाजे बंद केले नसल्याचेही रोहितने यावेळी नमूद केले. तंदुरुस्त राहून धावा केल्यास कोणालाही संधी मिळू शकते, असेही तो पुढे म्हणाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT