Ajaz Patel Dainik Gomantak
क्रीडा

एजाज पटेलने रचला इतिहास, टीम इंडिया बनली कठपुतळी

न्यूझीलंडचा एजाज पटेल हा कसोटी क्रिकेटच्या एका डावात 10 बळी घेणारा जगातील तिसरा आणि आपल्या देशातील पहिला गोलंदाज ठरला आहे.

दैनिक गोमन्तक

एजाज पटेल (Ajaz Patel) हा कसोटी क्रिकेटच्या एका डावात 10 बळी घेणारा जगातील तिसरा आणि न्यूझिलंड (New Zealand) पहिला गोलंदाज बनला आहे. मुंबईमध्ये खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याने ही कामगिरी केली. त्याच्या आधी इंग्लंडचा जिम लेकर आणि भारताचा अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी हा विक्रम केला होता. जिम लेकरने जुलै 1956 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) केले होते. त्याचवेळी कांबुळेने ही कामगिरी फेब्रुवारी 1999 मध्ये दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्ध केली होते. दरम्यान, एजाजचे मुंबईबद्दल एक वेगळेच नाते आहे. त्याचा जन्मही याच शहरात झाला. एजाजचा जन्म 21 ऑक्टोबर 1988 रोजी मुंबईतच झाला होता. जेव्हा तो आठ वर्षांचा होता, तेव्हा त्यांचे कुटुंब न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाले होते. तेव्हापासून तो या देशातील रहिवासी बनला. आता भारताला त्याच्या जन्मभूमीवरच हरवण्याचा न्यूझिलंडने निर्धार केला आहे.

घरच्या मैदानावर विकेट घेऊ शकलो नाही

एजाजच्या कारकिर्दीतील आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याला न्यूझीलंडमध्ये खातेही उघडता आले नव्हते. न्यूझीलंडमध्ये एजाज आतापर्यंत तीन सामने खेळला असून तीनही सामन्यांमध्ये त्याला विकेट घेता आलेली नाही.

सुरुवातीपासूनच अडचणीत, नशिबानेही साथ दिली

एजाजने सुरुवातीपासूनच टीम इंडियाला घेरण्यास, सुरुवात केली होती. त्यात त्याला नशिबानेही त्याला साथ दिल्याचे दिसून आले. टॉम ब्लंडलने सामन्याच्या पहिल्या दिवशी शुभमन गिलला बाद करण्याची संधी सोडली. परंतु पुढच्याच चेंडूवर गिल बाद झाला. त्याने विराट कोहलीलाही बाद केले. तो एलबीडब्ल्यू झाला. या एलबीडब्ल्यूवरुन वाद निर्माण झाला असला तरी कोहलीला बाद करण्यात आले. पहिल्या दिवशी भारताने चार विकेट गमावल्या होत्या. त्याने एकूण 47.5 षटके टाकली आणि 119 धावांत सर्व विकेट घेतल्या. त्याने एकूण 19 मेडन षटके टाकली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT