KL Rahul X/BCCI
क्रीडा

SA vs IND: 'तो संकटमोचक, जेव्हाही टीम इंडियाला...', KL राहुलच्या झुंजार फिफ्टीनंतर कोचकडून शाबासकी

KL Rahul: केएल राहुलने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय फलंदाजी ढेपाळली असताना नाबाद अर्धशतक करत पहिला डाव सांभाळला.

Pranali Kodre

South Africa vs India, 1st Test Match at Centurion, 1st Day, KL Rahul Fifty:

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघातील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला मंगळवारी (26 डिसेंबर) सुरुवात झाली. सेंच्युरियनला होत असलेल्या या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने पहिल्या दिवशी अर्धशतकी खेळी एकाकी झुंज दिली. त्याच्या या फलंदाजीनंतर त्याच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.

भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी त्याला संघाचा संकटमोचक म्हटले आहे. पहिल्या दिवसाच्या खेळानंतर रोठोड केएल राहुलबद्दल म्हणाले, 'तो आमचा संकटमोचक आहे. जेव्हाही कठीण परिस्थिती असते, तेव्हा तो मैदानात असतो. तो त्याच्या गेमप्लॅनबद्दल खूप स्पष्ट असतो की त्याला काय करायचे आहे.'

याशिवाय राठोड यांनी सेंच्युरियनवर फलंदाजी करणे कठीण असल्याचेही सांगितले, विशेषत: पावसाच्या वातावरणात.

ते म्हणाले, 'ही खेळपट्टी नेहमीच फलंदाजीसाठी आव्हानात्मक राहिली आहे. तसे वातावरणही आहे. खेळपट्टी कव्हरने एकादिवसाहून अधिकवेळ झाकलेली होती. पहिल्या दिवसाच्या खेळानंतर आमच्या काही विकेट्स बाकी असल्याचे पाहून चांगले वाटत आहेय आम्ही चांगला खेळ करत धावफलकावर धावा लावल्या आहेत.'

तसेच राठोड यांनी विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांचेही कौतुक केले. त्यांनी म्हटले, 'परिस्थिती कठीण होती. पहिल्या तीन विकेट्स गेल्यानंतर त्यातून सावरणारी विराट कोहली आणि श्रेयस अय्यरची भागीदारी होती. ते दोघेही चांगले खेळले.'

या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने 24 धावांवरच 3 विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर विराट आणि श्रेयस यांनी 68 धावांची भागीदारी करत भारताचा डाव सावरला. श्रेयस 31 धावांवर आणि विराट 38 धावांवर बाद झाला. त्यानंतरही भारताने काही विकेट्स झटपट गमावल्या.

मात्र शार्दुल ठाकूरने एक बाजू भक्कम सांभाळणाऱ्या केएल राहुलला साथ दिली. त्यांच्यात 43 धावांची भागीदारी झाली.

यादरम्यान, केएल राहुलने शानदार खेळ करत पहिल्या दिवसाखेर 105 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकारांसह 70 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने पहिल्या दिवसाखेर 59 षटकात 8 बाद 208 धावा केल्या. पहिल्या दिवशी कागिसो रबाडाने ५ विकेट्स घेतल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

SCROLL FOR NEXT