T20 World Cup 2026 IND VS PAK Dainik Gomantak
क्रीडा

IND VS PAK: भारत-पाक हायव्होल्टेज सामन्यावर पावसाचं सावट; सामना रद्द झाला तर कोणाला फायदा? असं असेल 'सुपर-8'चं गणित

T20 World Cup 2026 IND VS PAK: टी-२० विश्वचषक २०२६ मधील सर्वात बहुप्रतिक्षित २७ वा सामना आज भारत आणि पाकिस्तान दरम्यान रंगणार आहे.

Sameer Amunekar

कोलंबो: टी-२० विश्वचषक २०२६ मधील सर्वात बहुप्रतिक्षित २७ वा सामना आज भारत आणि पाकिस्तान दरम्यान रंगणार आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यापूर्वी मोठा वाद निर्माण झाला होता. सुरुवातीला पाकिस्तानने भारतासोबत खेळण्यास नकार दिला होता, मात्र आयसीसीने (ICC) दिलेल्या कडक इशाऱ्यानंतर पाकिस्तानचा संघ मैदानात उतरण्यास तयार झाला. मात्र, आता हा सामना खरोखर पार पडणार की वरुणराजा खोडा घालणार, याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

हवामान अंदाज

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज कोलंबोमध्ये पावसाची ६५ टक्के शक्यता आहे. दुपारच्या वेळी आकाशात ढगांची दाटी पाहायला मिळेल. जरी संध्याकाळी पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज असला, तरी सामना सुरू होण्याच्या वेळी (संध्याकाळी ७:०० वाजेच्या सुमारास) ५० टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हा सामना पूर्ण षटकांचा होणार की पावसामुळे रद्द करावा लागणार, याबाबत अनिश्चितता कायम आहे.

सामना रद्द झाल्यास कोणाचे पारडे जड?

जर पावसामुळे चेंडू न टाकताच सामना रद्द झाला, तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल. सध्या भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने जिंकून ४-४ गुणांसह गुणतालिकेत अव्वल दोन स्थाने पटकावली आहेत. भारताचा नेट रन रेट पाकिस्तानपेक्षा सरस असल्याने भारतीय संघ सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांचे ५-५ गुण होतील आणि भारत आपले अव्वल स्थान कायम राखेल.

सुपर-८ चे समीकरण

सामना रद्द झाला तरी दोन्ही संघांचा 'सुपर-८' मधील प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. भारताचा शेवटचा साखळी सामना नेदरलँड्सविरुद्ध होणार आहे, तर पाकिस्तानचा सामना नामिबियाशी होईल. हे दोन्ही सामने तुलनेने सोपे असल्याने भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ विजय मिळवून आरामात पुढच्या फेरीत प्रवेश करू शकतात. त्यामुळे पाऊस पडला तरी दोन्ही संघांच्या स्पर्धेतील प्रवासावर फारसा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता कमी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT