T20 World Cup 2026 final Dainik Gomantak
क्रीडा

Ind vs NZ: किवींचे 'चक्रव्यूह' टीम इंडियाला भेदता येईल का? टी-20 वर्ल्ड कपमध्ये कोणाचा वरचष्मा? फायनलपूर्वी धक्कादायक आकडे समोर

IND vs NZ Head to Head Record: टी२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना उद्या, ८ मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.

Sameer Amunekar

क्रिकेट विश्वातील सर्वात मोठा थरार आता आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. टी२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना उद्या, ८ मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. या ऐतिहासिक सामन्यात यजमान भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने येणार आहेत. कोट्यवधी भारतीय चाहत्यांच्या नजरा या सामन्याकडे लागल्या असून रोहित सेनेला घरच्या मैदानावर विश्वविजेतेपदाची सुवर्णसंधी आहे. मात्र, आकडेवारी पाहता न्यूझीलंडचे आव्हान टीम इंडियासाठी 'लोखंडी चणे' चावण्यासारखे असणार आहे.

विश्वचषकातील 'नकोसा' इतिहास बदलण्याचे आव्हान

भारतीय संघाने या संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत केवळ एकच सामना गमावला असून ते उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. मात्र, टी२० विश्वचषकाच्या इतिहासात डोकावून पाहिल्यास एक धक्कादायक वास्तव समोर येते.

विश्वचषकाच्या व्यासपीठावर भारतीय संघ आजवर कधीही न्यूझीलंडला पराभूत करू शकलेला नाही. २००७, २०१६ आणि २०२१ अशा तिन्ही विश्वचषकांमध्ये न्यूझीलंडने भारताला धूळ चारली आहे. त्यामुळे हा 'बदला' घेण्यासाठी आणि इतिहास बदलण्यासाठी उद्याचा सामना भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

हेड-टू-हेड रेकॉर्ड: कोणाचे पारडे जड?

एकूण टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा विचार केला, तर टीम इंडियाचा रेकॉर्ड समाधानकारक आहे. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आतापर्यंत ३० सामने खेळले गेले असून त्यापैकी १८ सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे (ज्यात दोन सुपर ओव्हर विजयांचा समावेश आहे).

तर न्यूझीलंडने ११ सामन्यांत बाजी मारली आहे. भारतीय खेळपट्ट्यांवर तर भारताचा रेकॉर्ड अधिक सरस आहे; १६ पैकी ११ सामन्यांत भारताने आपल्या देशात कीवींचा पराभव केला आहे. हीच बाब भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवणारी ठरू शकते.

न्यूझीलंडचा अनुभव ठरणार कळीचा मुद्दा

न्यूझीलंडच्या संघाला भारतीय परिस्थितीचा दांडगा अनुभव आहे. विश्वचषकापूर्वी झालेल्या ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत जरी भारताने ४-१ असा विजय मिळवला असला, तरी कीवी खेळाडूंनी या मालिकेच्या माध्यमातून इथल्या खेळपट्ट्यांचा चांगला सराव केला आहे. या विश्वचषकात न्यूझीलंडला दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला असला, तरी मोठ्या सामन्यात पुनरागमन करण्याची त्यांची क्षमता वाखाणण्याजोगी आहे.

अहमदाबादच्या एक लाखाहून अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत टीम इंडिया विश्वचषकातील आपला न्यूझीलंडविरुद्धचा 'दुष्काळ' संपवून जेतेपदावर नाव कोरते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT