Suryakumar Yadav Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup: PAK विरुद्धच्या सामन्यापूर्वी 'सूर्या' ची कमाल, दिग्गजांना टाकले मागे

Suryakumar Yadav​: भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव ताज्या ICC T20 क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे.

दैनिक गोमन्तक

Team India: भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव ताज्या ICC T20 क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. सूर्यकुमार यादव टी-20 विश्वचषकातील दुसरा सर्वोत्तम फलंदाज म्हणून मैदानात उतरणार आहे. पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान (861 रेटिंग गुण) याने न्यूझीलंडमधील तिरंगी मालिकेदरम्यान आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर प्रथम क्रमांकावर आपली आघाडी मजबूत केली आहे.

सूर्यकुमार यादवसाठी आनंदाची बातमी

रविवारी एमसीजी येथे भारत (India) आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी सूर्यकुमार (838 धावा) दुसऱ्या स्थानावर कायम राहिला. केएल राहुल (13), विराट कोहली (Virat Kohli) (15) आणि कर्णधार रोहित शर्मा (16) यांनीही ताज्या अपडेटमध्ये आपले स्थान कायम ठेवले आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम आणि न्यूझीलंडचा डेव्हॉन कॉनवे यांच्यानंतर तिसऱ्या स्थानावर आहे.

मोठ्या फलंदाजांना मागे टाकले

अव्वल 10 मधील एकमेव बदल न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सच्या क्रमवारीत आला आहे. बांगलादेश आणि पाकिस्तान विरुद्धच्या तिरंगी मालिकेत आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर फिलिप्सने 13 अंकानी झेप घेतली. तो आता 10 व्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे, हार्दिक पंड्या 173 रेटिंग गुणांसह अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत सहाव्या स्थानावर आहे.

शाकिब अल हसन अव्वल अष्टपैलू खेळाडू

बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसन हा अव्वल अष्टपैलू खेळाडू म्हणून T20 विश्वचषकात सहभागी होणार आहे. शाकिब अल हसनने अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीला अव्वल स्थानावरुन हटवले आहे. न्यूझीलंड आणि पाकिस्तानविरुद्धच्या तिरंगी मालिकेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर शाकिबने अव्वल स्थान पटकावले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

Goa Sexual Assault Case: वेर्णा सामूहिक बलात्कार प्रकरणातील सहआरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल!

Property Dispute Attack: आंबावलीत मालमत्तेच्या वादातून तुफान हाणामारी! लाकडी दांड्याने हल्ला करुन वृद्धाला केले गंभीर जखमी; चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा

Rahul Gandhi: 'केवळ रस्त्यावर उतरुन सत्तापालट होत नाही', 'अच्छे दिन'च्या धर्तीवर 2029 साठी राहुल गांधींचा प्लॅन काय? 12 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे आव्हान

CJP Protest: ‘सीजेपी’चे आंदोलक पोलिसांच्या रडारवर, 300 अज्ञातांविरोधात गुन्हा; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT