T20 World Cup 2022 Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup: आज टिम इंडियासमोर इंग्लंडचं आव्हान; पाहा कधी, कुठं होणार सामना

IND vs ENG: आज भारतीय संघासाठी करो या मरो च्या सामन्यात भारतासमोर इंग्लंडचं आव्हान असणार आहे.

दैनिक गोमन्तक

भारतीय संघ आज इंग्लंड विरोधात मैदानात उतरणार आहे. हा सामना विश्वचषकातील दुसरा (T20 World Cup) सेमीफायनलचा सामना असणार असून जिंकणारा संघ पाकिस्तानशी फायनलमध्ये दोन हात करेल. भारतीय संघाने सुपर 12 फेरीतील 5 पैकी 4 सामने जिंकत सेमीफायनल आपल्या नावे केली आहे. तर इंग्लंड संघाने 5 पैकी 3 सामने जिंकले असून त्यांचा एक सामना अनिर्णीत सुटला होता. ज्यामुळे दोन्ही संघ कमाल फॉर्मात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आजचा हा 'करो या मरो' चा सामना दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.

  • कधी आहे सामना?

भारत विरुद्ध इंग्लंड हा सामना आज अर्थात 10 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सामना सुरु होईल. सामना सुरु होण्यापूर्वी अर्धातास नाणेफेक होणार आहे.

  • कुठे आहे सामना?

हा सामना ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅडलेड येथील अ‍ॅडलेड ओव्हल क्रिकेट स्टेडियम (Adelaide Cricket Stadium) येथे खेळवला जाणार आहे.

  • कुठे पाहता येणार सामना?

या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अ‍ॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकते.

टी20 क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड संघ यांच्यात आतापर्यंत 22 टी-20 सामने खेळवले गेले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता भारताचे पारडे काहीसे जड राहिल्याचे दिसून आले आहे. भारताने 22 पैकी 12 सामन्यात विजय मिळवलाय. तर, इंग्लंड संघाला 10 सामने जिंकता आले आहेत.

  • दोन्ही संघातील खेळाडू

भारत संघ:

रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार.

इंग्लंड संघ:

अॅलेक्स हेल्स, जोस बटलर, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, फिल सॉल्ट, सॅम कुरन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड/डेव्हिड विली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT