T20 World Cup 2022 Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup 2022: आज पाकिस्तान भिडणार दक्षिण आफ्रिकेशी, जाणून घ्या सविस्तर

PAK vs SA: T20 विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत तीन सामने झाले असून, तिन्ही सामने पाकिस्तानने जिंकले आहेत.

दैनिक गोमन्तक

T20 विश्वचषक 2022 (T20 WC 2022) मध्ये आज दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार हो आहे. सिडनी क्रिकेट मैदानावर (SCG) दुपारी 1.30 वाजता दोन्ही संघ आमनेसामने येतील. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ उपांत्य फेरीचे तिकीट मिळवण्याच्या इराद्याने उतरणार आहे. त्याचबरोबर पाकिस्तानला उपांत्य फेरीच्या आशा कायम ठेवण्यासाठी हा सामना कोणत्याही किंमतीवर जिंकायचा आहे.

ग्रुप-2 मधून आतापर्यंत कोणताही संघ उपांत्य फेरीत पोहोचलेला नाही. त्यामुळे हा सामना खूप महत्त्वाचा आहे. पाकिस्तानचा संघ येथे हरला तर त्यांचा उपांत्य फेरीचा मार्ग बंद होईल.दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत पोहोचेल आणि भारत किंवा बांगलादेशला पुढे जाण्याची संधी असेल. पुढच्या सामन्यात पाकिस्तानला चांगल्या फरकाने हरवल्यास आणि भारतीय संघ झिम्बाब्वेकडून पराभूत झाल्यास बांगलादेशलाही उपांत्य फेरी गाठता येईल. ही परिस्थिती अशक्य वाटते. म्हणजेच आज जर पाकिस्तान हरला तर टीम इंडिया जवळपास उपांत्य फेरीत पोहोचेल.

जर पाकिस्तानने हा सामना जिंकला तर दक्षिण आफ्रिकेलाही सेमीफाइनल गाठण्यासाठी पुढील सामन्याची वाट पाहावी लागणार आहे. प्रोटीज संघाला नेदरलँड्सविरुद्ध शेवटचा सामना खेळायचा आहे. नेदरलँड्सकडून विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेचा संघ सहज आपले स्थान पक्के करेल. त्याचबरोबर भारतीय संघाने झिम्बाब्वेला पराभूत केल्यास ते उपांत्य फेरीतही पोहोचेल. आजचा सामना जिंकूनही पाकिस्तान बाद होऊ शकतो. पण जर भारतीय संघ झिम्बाब्वेकडून हरला आणि पाकिस्तानच्या संघाने बांगलादेशला चांगल्या फरकाने पराभूत केले तर ते उपांत्य फेरीत पोहोचू शकतात.

T20 विश्वचषकात पाकिस्तानचा पारडे जड

T20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामने झाले असून, तिन्ही सामने पाकिस्तानने जिंकले आहेत. मागील रेकॉर्डनुसार पाकिस्तानचे पारडे जड असल्याचे दिसते. सध्याची कामगिरी पाहता दक्षिण आफ्रिकेचा संघ जबरदस्त लयीत आहे. त्याचे फलंदाज आणि गोलंदाज आपापल्या भूमिका चोख बजावत आहेत. याउलट पाकिस्तानचा संघ फलंदाजीत खूप संघर्ष करताना दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa London Flight: अहमदाबाद क्रॅशनंतर बंद झालेली एअर इंडियाची गोवा - लंडन विमानसेवा पुन्हा सुरु होणार, बुकिंग सुरु; वाचा वेळापत्रक

Goa Politics: ठरलं! दिगंबर कामत, रमेश तवडकर होणार मंत्री; गुरुवारी 12 वाजता राजभवनात शपथविधी सोहळा

Goa Minister Resigned: पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांचा राजीनामा; गुरुवारी तवडकर, कामत घेणार शपथ

Asia Cup 2025: ‘...काही फरक पडत नाही’, भारत-पाकिस्तान सामन्यावर वसीम अक्रमचं मोठं वक्तव्य; पाहा काय म्हणाले VIDEO

Viral Video: ‘डिग्रीची किंमत घटली...’! फिरायच्या नादापायी केलं ट्रक ड्रायव्हरसोबत लग्न; महिलेचा अतरंगी व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT