Team India Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup: जगातील सर्वात खूंखार गोलंदाज ऑस्ट्रेलियन भूमीवर उतरणार, भारतातून झाला रवाना

T20 World Cup 2022: टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

Team India Squad For T20 World Cup 2022: टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताचा एक वेगवान गोलंदाज टी-20 विश्वचषक 2022 साठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. टूर्नामेंट सुरु होण्याच्या अवघ्या काही दिवस आधी टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करुन या खेळाडूने चाहत्यांना ऑस्ट्रेलियाला रवाना झाल्याची माहिती दिली. हा खेळाडू गेल्या विश्वचषकातही संघाचा भाग होता.

हा खेळाडू ऑस्ट्रेलियाला रवाना झाला

T20 विश्वचषक (T20 World Cup) 2022 पूर्वी, भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीने NCA (National Cricket Academy) मधील फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली आहे. दक्षिण आफ्रिका मालिकेपूर्वी मोहम्मद शमीला कोरोनाची लागण झाली होती, मात्र आता तो ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. फोटो शेअर करत मोहम्मद शमीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आता टी-20 वर्ल्ड कपसाठी निघण्याची वेळ आली आहे.'

2021 च्या T20 विश्वचषकातही संधी मिळाली

मोहम्मद शमी (Mohammed Shami) गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकात संघाचा भाग होता. मात्र या टी-20 विश्वचषकात त्याची कामगिरी अत्यंत खराब झाली होती. मोहम्मद शमीने गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकात नामिबियाविरुद्ध शेवटचा टी-20 सामना खेळला होता. मोहम्मद शमी 2021 च्या टी-20 विश्वचषकापासून टी-20 संघाबाहेर होता. शमीने गेल्या एका वर्षात टीम इंडियासाठी एकही टी-20 सामना खेळलेला नाही. मात्र त्याने आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये चमकदार कामगिरी केली आहे.

T20 विश्वचषकासाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, आर पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर अश्विन, वाय चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल अर्शदीप सिंग.

स्टँडबाय खेळाडू- मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mopa Airport: गोव्यात Air India विमानाचा मोठा अनर्थ टळला! रन-वे सोडून केला टॅक्सी-वेवरून उड्डाणाचा प्रयत्न

Viral Video: थरारक...! जंगल सफारीचा रोमांचक अनुभव, चिडलेल्या गेंड्याचा गाडीवर हल्ला; थक्क करणारा व्हिडिओ व्हायरल

Elvish Yadav: "अनेक घरे उद्ध्वस्त केली..." भाऊ गँगने एल्विश यादवच्या घरावर झाडल्या गोळ्या; पोस्ट करत दिली माहिती, हल्ल्याचे कारणही सांगितले

Goa Live News: सरकारी प्राथमिक शिक्षक सरकारी पतसंस्थेतर्फे निवृत्त शिक्षकांचा गौरव सोहळा

Asia Cup 2025: आशिया कपसाठी पाकिस्तान संघ जाहीर, बाबर-रिझवानला डच्चू; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

SCROLL FOR NEXT