ऑस्ट्रेलियाचा (Australia) संघ सध्या वेस्टइंडिज (West Indies) दौऱ्यावर असून या दोन्ही संघात टी-20 चा थरार सध्या सुरु आहे. काल रंगलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने जबरदस्त प्रदर्शन करीत विजयाची हॅट्रिक केली आहे. कालच्या सामन्यात ख्रिस गेलने (युनिवर्सल बॉस) (Universal Boss) ऐतिहासिक (Chris Gayle Historic Performance) कामगिरी केली आहे. त्याने धुव्वाधार फलंदाजी करत 431 टी-20 सामन्यात 14038 धावा (14038 runs in T20 matches) केल्या आहेत. टी-20 14 हजारांचा टप्पा पार करणारा गेल पहिलाच फलंदाज ठरला आहे.
टी-20 क्रिकेटचा बॉस अशी ओळख असलेला ख्रिस गेल या अधीच्या 2 सामन्यात संघर्ष करताना आपण पाहिले आहे. मात्र तिसऱ्या सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची अक्षर:पिसे काढली. मैदानाच्या चारही बाजूंना गेलचे वाधळ घोंगावत होते. त्याने 38 चेंडूत 7 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 67 धावा केल्या. या आक्रमक खेळीत त्याने 431 टी-20 सामन्यात 14038 धावा करण्याच्या विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने 2016 च्या टी-20 विश्वचषकानंतर काल प्रथमच अर्धशतक ठोकले.
गेलनंतर टी-20 सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम पोलार्डच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत 10836 धावा केल्या आहेत. तर पाकिस्तानचा शोएब मलिक या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर 10741 धावा आहेत.
ऑस्ट्रेलिया विरुध्द झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 6 बाद141 धावा केल्या होत्या. यात मोझेस हेन्रिक्सने सर्वाधिक 33 धावा केल्या. तर वेस्ट इंडिजच्या हेडिन वॉल्शने सर्वाधिक 2 गडी बाद केले. 142 धावांचा पाठलाग करताना ख्रिस गेलने 67 धावांची धुवाधार खेळी केली. तर निकोलस पूरनने 27 चेंडूत 32 धावा केल्या आहे. वेस्टइंडिजने 14.5 षटकांत 4 विकेटच्या मोबदल्यात हा सामना जिंकला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.