Sanjana Prabhugaonkar | National Games Goa 2023 Dainik Gomantak
क्रीडा

National Games Goa : संजना प्रभुगावकरची पदक हॅट्‌ट्रिक

जलतरणात जिंकले रौप्य ः वुशू खेळात गोव्याच्या जनिवा हिला ब्राँझपदक

गोमन्तक डिजिटल टीम

National Games Goa : पणजी, गोव्याची सोळा वर्षीय प्रतिभाशाली जलतरणपटू संजना प्रभुगावकर हिने गुरुवारी ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सलग तिसरे पदक जिंकून अनोखी हॅटट्रिक साधली.

कांपाल येथील जलतरण तलावात तिने महिलांच्या १०० मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीत रौप्यपदक पटकावले.

संजना स्पर्धेत आणखी दोन शर्यतीत भाग घेणार आहे, त्यामुळे तिच्याकडून गोव्याच्या खात्यात आणखी पदकांची अपेक्षा आहे.

स्पर्धेत यापूर्वी २०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये रौप्य व २०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये ब्राँझपदक जिंकल्यानंतर गुरुवारी तिने पुन्हा पोडियम फिनिश मिळविले.

ही शर्यत कमालीची रंगतदार ठरली. महाराष्ट्राची पलक जोशी, संजना आणि कर्नाटकची रिधिमा कुमार यांच्यात जबरदस्त चढाओढ राहिली.

पलकने १ मिनिट ०५.२९ सेकंद वेळेसह सुवर्ण, संजनाने १ मिनिट ०५.७३ सेकंद वेळेसह रौप्य, तर रिधिमाने १ मिनिट ०५.८६ सेकंद वेळेसह ब्राँझपदक मिळविले.

संजनाची ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदके

२०० मीटर फ्रीस्टाईल ः रौप्य (२ मिनिटे ०८.८९ सेकंद)

२०० मीटर बॅकस्ट्रोक ः ब्राँझ (२ मिनिटे २३.६४ सेकंद)

१०० मीटर बॅकस्ट्रोक ः रौप्य (१ मिनिट ०५.७३ सेकंद)

वुशू खेळात आणखी एक पदक

1 कांपाल येथे सुरू असलेल्या वुशू खेळात गोव्याला गुरुवारी ब्राँझपदक मिळाले. जनिव्हा फर्नांडिस हिने महिलांच्या दाओशू प्रकारात ७.१० स्कोअर नोंदवून ब्राँझपदकावर हक्क सांगितला. या खेळातील गोव्याचे हे दुसरे पदक ठरले.

काल या खेळात गोव्याला रौप्य पदक मिळाले होते. या प्रकारात अरुणाचल प्रदेशच्या न्येमान वांगशू हिला सुवर्ण, तर झारखंडच्या सुनिता गारी हिला रौप्यपदक मिळाले.

2 नंतर जनिव्हा हिने सांगितले, की ‘‘पदक जिंकण्याचा मला पूर्ण विश्वास होता. राष्ट्रीय स्पर्धेतील सहभागासाठी मी खूप मेहनत घेतली होती.

मला जास्त स्पर्धा खेळायला मिळाल्या नाहीत, परंतु माझे प्रशिक्षक असलेल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेली मेहनत फलदायी ठरली. राज्यासाठी पदक जिंकू शकले याचा खूप आनंद झाला आहे.’’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Electricity Conservation: विजेची बचत करा! शासकीय कार्यालयांना सावंत सरकारचा आदेश; नियमांचे पालन न केल्यास...

Cash For Job Scam: मंत्र्यांच्‍या कार्यालयांशी जवळीक, म्हणून अनेकजण भुलले 'श्रुतीला'; कष्टाची कमाई गमावली !

Rashi Bhavishya 15 November 2024: आरोग्यात सुधारणा होईल, नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी प्रगती कराल; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

हायकोर्टाने तयार केलेल्या सेवाशर्तीच्या नियमात बदल; गोवा सरकारचा बचाव करणाऱ्या मुख्य सचिवांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

Cash For Job Scam: 'प्रत्येकाला वाटतंय मीच CM, गोवा सरकारमध्ये सुरुय सर्कस, सगळे जोकर खेळतायेत'; LOP युरींची टीका

SCROLL FOR NEXT