ICC Latest T20 Ranking: टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवसाठी हे वर्ष काही खास राहिलेलं नाही. दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सूर्यकुमार यादवला एक आनंदाची बातमी दिली आहे. वास्तविक, ICC ने T20 फलंदाजांची नवीन क्रमवारी (ICC T20 Ranking) जाहीर केली आहे.
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सध्याच्या इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) मध्ये वाईट टप्प्यातून जात आहे, परंतु ICC (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) पुरुषांच्या T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे.
सूर्यकुमार 906 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे तो पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान (811 गुण) आणि कर्णधार बाबर आझम (755 गुण), दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम (748 गुण) आणि न्यूझीलंडचा डेव्हॉन कॉनवे (745 गुण) यांच्यापेक्षा आताही पुढे आहे. त्याचबरोबर विराट कोहली 15व्या स्थानावर कायम आहे.
न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील नुकत्याच संपलेल्या T20I मालिकेनंतर खेळाडूंना जबरदस्त फायदा झाला. युवा फिरकीपटू महिश तिक्षाना कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग मिळवून गोलंदाजांच्या क्रमवारीत संयुक्तरित्या पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.
अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान (Rashid Khan) गोलंदाजांच्या यादीत देशबांधव फझलहक फारुकी, ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड आणि श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा यांच्या पुढे आहे. गोलंदाजांच्या यादीत पहिल्या दहामध्ये एकाही भारतीयाचा समावेश नाही.
बांगलादेशने मिरपूरमध्ये आयर्लंडवर मिळवलेल्या विजयानंतर कसोटी क्रमवारीतही काही बदल झाले आहेत.
कसोटी फलंदाजांच्या यादीत मुशफिकुर रहीमला पाच अंकाचा फायदा झाला असून तो 126 आणि नाबाद 51 धावा करत 17व्या स्थानावर पोहोचला आहे.
तर गोलंदाजांच्या यादीत तैजुल इस्लाम आणि शाकिब अल हसन या फिरकी जोडीलाही फायदा झाला आहे.
तैजुलने पाच विकेट घेत तीन अकांची आघाडी घेऊन 20 व्या स्थानावर पोहोचला. तर बांगलादेशचा कर्णधार शाकिब संयुक्तपणे 26 व्या क्रमांकावर पोहोचला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.