India vs Australia | Mukesh Kumar - Suryakumar Yadav 
क्रीडा

IND vs AUS: 'आयुष्यातीत सर्वात मोठी मॅच खेळायला गेलाय...', मुकेश संघाबाहेर होण्याचं सूर्याकडून खरं कारण उघड

India vs Australia, 3rd T20I: सूर्यकुमार यादवने मुकेश कुमार ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात का खेळला नाही, याचं खरं कारण उघड केले आहे.

Pranali Kodre

Suryakumar Yadav revealed reason behind Mukesh Kumar unavailability in India vs Australia 3rd T20I at Guwahati:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या 5 सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा सामना गुवाहाटीमधील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जात आहे. दरम्यान, या सामन्याआधी भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने एक मोठा खुलासा केला आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू हेडने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेकीवेळीच सूर्यकुमारने प्लेइंग इलेव्हनमधील बदल सांगताना मुकेश कुमारच्या न खेळण्याचे कारणही सांगितले.

मुकेश तिसऱ्या टी20 सामन्यासाठी अनुपलब्ध आहे. यामागेचे कारण म्हणजे तो त्याच्या लग्नासाठी परत गेला आहे. त्यामुळे मुकेशच्या जागेवर तिसऱ्या टी20 सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आवेश खानला संधी देण्यात आली आहे.

याबद्दल सांगताना सूर्यकुमार म्हणाला, 'प्रथम फलंदाजी करण्याबद्दल आण्ही खूश आहोत. कारण दव पहिल्या डावापासूनच पडत आहे. आमच्या योजना तयार आहेत. आम्ही संघात एक बदल केला आहे. आवेशला मुकेशच्या जागेवर संधी दिली आहे. मुकेश त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा सामना सध्या खेळायला गेला आहे, तो लग्न करत आहे आणि आम्ही त्याला त्यासाठी शुभेच्छा देतो.'

दरम्यान, मुकेश ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात खेळला होता. पण विशाखापट्टणमला झालेल्या पहिल्या सामन्यात त्याला एकही विकेट घेता आली नव्हती. तसेच तिरुवनंतपुरमला झालेल्या दुसऱ्या सामन्यात त्याने एक विकेट घेतली होती.

मुकेशने 2023 मध्येच भारतीय संघाकडून पदार्पण केले आहे. त्याने भारताकडून 1 कसोटी, 3 वनडे आणि 7 टी20 सामने खेळले आहेत. यात त्याने कसोटीत 2 विकेट्स, वनडेत 4 विकेट्स आणि टी20 मध्ये 4 विकेट्स घेतल्या आहेत.

तिसऱ्या टी20 सामन्यासाठी भारताची प्लेइंग इलेव्हन -

यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, तिलक वर्मा, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, आवेश खान, प्रसिध कृष्णा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket Controversy: "आपसी रंजिश, गुस्सा और खराब भाषा..." ज्युनियर्सवर हल्ल्याच्या आरोपानंतर बांगलादेशी कर्णधाराचा मोठा खुलासा, पोस्ट करत म्हणाली...

मोठा आवाज, टिंटेड गाडी आणि जीवघेणी स्टंटबाजी! गोव्यात प्रसिद्ध इन्फ्लुएंसरची मॉडिफाईड BMW जप्त

Terror Attack In Jammu Kashmir: 'ऑपरेशन सिंदूर'चा बदला! जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याची तयारी सुरु, गुप्तचर रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

MS Dhoni Retirement: 'कॅप्टन कूल'च्या निवृत्तीबद्दलचा सस्पेन्स संपला! एमएस धोनी IPL 2026 खेळणार की नाही? CSK च्या CEO ने स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

Horoscope: 2026 साठी काहीच दिवस बाकी! शनि-गुरूच्या हातात नशिबाचे चक्र, 'या' राशींना मिळणार भाग्याची खास साथ; मात्र काहींना साडेसातीचा धोका फार

SCROLL FOR NEXT