Suryakumar Yadav Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: इतिहास रचण्यापासून SKY एक पाऊल दूर; अशी कामगिरी करणारा ठरणार पहिला भारतीय!

Manish Jadhav

Suryakumar Yadav, IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना केरळची राजधानी तिरुवनंतपुरममध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता होणार आहे. तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील. कर्णधार सूर्यकुमार यादवसाठी हा सामना खूप खास असणार आहे. या सामन्यात त्याने मोठी खेळी खेळली तर तो इतिहास रचू शकतो.

इतिहास रचण्यापासून सूर्या एक पाऊल दूर

दरम्यान, सूर्यकुमार यादव आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 2000 धावा पूर्ण करण्यापासून फक्त 79 धावा दूर आहे. सूर्याने आतापर्यंत 51 डावांमध्ये 46.85 च्या सरासरीने आणि 173.37 च्या स्ट्राईक रेटने 1921 धावा केल्या आहेत. जर सूर्याने या सामन्यात हा आकडा पार केला तर तो आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वात जलद 2000 हजार धावा करणारा भारतीय फलंदाज बनू शकतो. हा विक्रम सध्या विराट कोहलीच्या नावावर आहे. कोहलीने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 2000 धावा पूर्ण करण्यासाठी 56 डाव खेळले होते. याचा अर्थ सूर्याकडे सर्वात जलद 2000 T20 धावा करणारा भारतीय होण्यासाठी अजून 4 डाव आहेत.

बाबर-रिजवानच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 हजार धावा करण्याचा विक्रम बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्या नावावर आहे. या दोघांनी 52 डावात ही कामगिरी केली आहे. अशा स्थितीत या दोन्ही खेळाडूंच्या विक्रमाशी बरोबरी करण्यासाठी सूर्यकुमार यादवला पुढील डावात 79 धावा कराव्या लागतील.

T20 मध्ये सर्वात जलद 2000 हजार धावा करणारा फलंदाज

बाबर आझम – 52 डाव

मोहम्मद रिझवान – 52 डाव

विराट कोहली - 56 डाव

केएल राहुल – 58 डाव

अॅरॉन फिंच – 62 डाव

पहिल्या T20 मध्ये तो मॅच विनिंग इनिंग खेळी खेळला

सूर्यकुमार यादवने टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात शानदार फलंदाजी केली. सूर्याने केवळ 42 चेंडूंत 9 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 80 धावा केल्या होत्या. सूर्यकुमार यादव हा T20 क्रिकेटमधला नंबर-1 फलंदाज आहे आणि आता तो एक कर्णधार म्हणूनही आपल्या चाहत्यांची मनं जिंकत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

Mhadei Water Dispute: म्हादईवर वक्रदृष्टी कायम! कर्नाटक सरकारच्या 'करनाटकी वृत्ती'वर पर्यावरणप्रेमी केरकर स्पष्टच बोलले

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

Saint Estevam Accident: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी मित्र कल्पराज आणि प्रेयसीची दोन तास चौकशी; पोलिसांकडून प्रश्नांची सरबत्ती!

SCROLL FOR NEXT