Team India BCCI
क्रीडा

IND vs AUS T20: वर्ल्डकप संपल्यावर हार्दिक नाही, तर 'हा' खेळाडू सांभाळणार भारतीय संघाचे नेतृत्व

Team India Captain: वर्ल्डकप 2023 स्पर्धेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी20 मालिका रंगणार आहे.

Pranali Kodre

India vs Australia T20 Series:

भारतात सध्या वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा सुरु आहे. ही स्पर्धा 19 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यानंतर लगेचच 4 दिवसात 23 नोव्हेंबरपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 5 सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी अद्याप भारतीय संघाची घोषणा झालेली नाही.

दरम्यान, या मालिकेसाठी अनेक मोठ्या खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची चर्चा आहे. तसेच भारतीय टी20 संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या पायाला झालेल्या दुखापतीतून सावरत असल्याने त्याच्याही खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. तसेच आता अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार हार्दिक अद्याप पूर्ण फिट झालेला नाही.

त्याचमुळे आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी सूर्यकुमार यादव याच्याकडे भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व सोपवण्यात येण्याची दाट शक्यता आहे.

हार्दिकला दुखापतीतून बरा होण्यासाठी दोन महिने लागणार आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० मालिकेत आणि त्यानंतर होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात खेळू शकणार नाही. त्यामुळे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सूर्यकुमार यादव याच्याकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात येईल. याआधीही त्याने ही जबाबदारी पार पाडली आहे.

भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच टी20 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. दोन देशांमधील हे सामने नोव्हेंबर महिन्यातील 23, 26, 28 या तारखांना आणि डिसेंबर महिन्यातील 1 आणि 3 या तारखांना खेळवण्यात येणार आहेत. विशाखापट्टणम, त्रिवेंद्रम, गुवाहाटी, नागपूर, हैदराबाद या पाच ठिकाणी हे सामने होणार आहेत.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, टी20 मालिकेचे वेळापत्रक

  • 23 नोव्हेंबर - पहिला टी20 सामना, विशाखापट्टणम

  • 26 नोव्हेंबर - दुसरा टी20 सामना, तिरुवनंतपुरम

  • 28 नोव्हेंबर - तिसरा टी20 सामना, गुवाहाटी

  • 1 डिसेंबर - चौथा टी20 सामना, नागपूर

  • 3 डिसेंबर - पाचवा टी20 सामना, हैदराबाद

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

SCROLL FOR NEXT