Suryakumar Yadav Dainik Gomantak
क्रीडा

Suryakumar Yadav: 6,6,6,6, ऑस्ट्रेलियाची पळता भूई थोडी! सूर्याची तुफानी बॅटिंग, पाहा Video

India vs Australia: इंदूरला झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत भारताकडून सूर्यकुमारने तुफानी फटकेबाजी करत अर्धशतक झळकावले.

Pranali Kodre

Suryakumar Yadav Hit four consecutive Sixes during Indian Vs Australia 2nd ODI at Indore:

भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेतील दुसरा सामना रविवारी सुरू आहे. इंदूरमधील होळकर क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात भारतीय फलंदाजांनी दमदार कामगिरी केली आहे. दरम्यान, सूर्यकुमार यादवनेही तडाखेबंद फलंदाजी केली.

या सामन्यात भारताकडून सहाव्या क्रमांकावर उतरलेल्या सूर्यकुमार यादवने 37 चेंडूत 72 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 6 षटकार ठोकले. त्याने ही खेळी करताना केएल राहुलबरोबर 53 धावांची भागीदारी केली. दरम्यान, त्याने 44 व्या षटकात जोरदार फटकेबाजी केली.

सूर्याचा आक्रमक अंदाज

सूर्यकुमारने कॅमेरॉन ग्रीनविरुद्ध आक्रमक पवित्रा स्विकारला आणि 44 व्या षटकाच्या पहिल्या चारही चेंडूवर षटकार ठोकले. त्याने पहिल्या चेंडूवर बॅकवर्ड स्क्वेअरला षटकार मारला, तर दुसऱ्या चेंडूवर फाईन लेगवरून षटकार मारला.

त्याने एक्स्ट्रा कव्हरला तिसरा षटकार मारला, तर चौथा षटकार त्याने मिड विकेटला मारला. मात्र, पाचव्या चेंडूवर त्याला 1 धाव करता आली. या षटकाच्या सहाव्या चेंडूवर केएल राहुलनेही 1 धाव काढल्याने या षटकात एकूण 26 धावा निघाल्या.

भारताने उभारला धावांचा डोंगर

दरम्यान, या सामन्यात भारताकडून सलामीवीर ऋतुराज गायकवाड 8 धावांवर बाद झाल्यानंतर शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी शतके ठोकली. गिलने 104 धावांची खेळी केली, तर श्रेयस अय्यरने 105 धावांची खेळी केली.

त्यानंतर केएल राहुलने 52 धावांची खेळी केली. त्याचबरोबर सूर्यकुमारनेही अर्धशतक झळकावले. तसेच इशान किशनने 31 धावांची खेळी केली, तर रविंद्र जडेजा 13 धावांवर नाबाद राहिला. त्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 बाद 399 धावांचा डोंगर उभारला.

ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरॉन ग्रीनने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तसेच जोश हेझलवूड, सीन ऍबॉट आणि ऍडम झम्पा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT