इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. हा आयपीएलचा 17 वा हंगाम आहे. दरम्यान, सनरायझर्स हैदराबाद या हंगामात वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. सनरायझर्स हैदराबादने गुरुवारी नवी जर्सी लाँच केली आहे.
ही जर्सी काहीशी SA20 स्पर्धेतील सनरायझर्स इस्टर्न केप संघासारखी आहे. सनरायझर्स इस्टर्न केप ही सनरायझर्स हैदराबादची सिस्टर फ्रँचायझी आहे.
दरम्यान, सनरायझर्स हैदराबादची जर्सी ही नेहमीप्रमाणे केशरी रंगाची आहे. त्यात काळ्या रंगाचाही समावेश असून डिझाईन मात्र यावेळी थोडी वेगळी आहे.
यंदाच्या हंगामासाठी सनरायझर्स हैदराबाद संघाने अनेक बदल केले आहेत. त्यांनी कर्णधार आणि प्रशिक्षकही बदलले आहेत. त्याचबरोबर संघातही अनेक अनुभवी खेळाडूंचा समावेश केला आहे.
यंदाच्या हंगामासाठी ऑस्ट्रेलियाचा विश्वविजेता कर्णधार पॅट कमिन्सकडे सनरायझर्स हैदराबादने कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे. त्याचबरोबर डॅनिएल विट्टोरीकडे संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
सनराझर्स हैदराबाद संघ गेल्यावर्षी गुणतालिकेस सर्वात खाली म्हणजेच 10 व्या क्रमांकावर राहिला होता.
त्यानंतर संघाने 2024 हंगामाच्या लिलावापूर्वी हॅरी ब्रुक, आदील राशीद, कार्तिक त्यागी यांसारख्या खेळाडूंना करारमुक्त केले. तसेच ट्रेविस हेड, वनिंदू हसरंगा, आकाश सिंग, जयदेव उनाडकट अशा खेळाडूंना संघात घेतले.
सनरायझर्स हैदराबाद संघ आयपीएल 2024 स्पर्धेत पहिला सामना 23 मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध खेळला जाणार आहे.
पॅट कमिन्स (कर्णधार),एडेन मार्कराम, राहुल त्रिपाठी, मयंक अगरवाल, हेन्रिक क्लासेन, ग्लेन फिलिप्स, उपेंद्र यादव, नितीश कुमार रेड्डी, अनमोलप्रीत सिंग, सनवीर सिंग, अब्दुल समद, मार्को यान्सिन, अभिषेक शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, टी नटराजन, मयंक मार्कंडे, फजलहक फारुकी, शाहबाज अहमद, ट्रेव्हिस हेड, जयदेव उनाडकट, वनिंदूं हसरंगा, आकाश महाराज सिंग, जे. सुब्रमण्यम
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.