IPL news Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2022 पूर्वी सनरायझर्स हैदराबादला बसला मोठा धक्का

गेल्या मोसमात सनरायझर्स हैदराबादची कामगिरी अत्यंत खराब झाली होती.

दैनिक गोमन्तक

आयपीएल 2022 चा तमाशा सुरू झाला नाही तोच सनरायझर्स हैदराबादच्या विकेट पडू लागल्या आहेत. याची सुरुवात संघाशी संबंधित प्रशिक्षकापासून झाली. ऑरेंज आर्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फ्रेंचायझीचे सहाय्यक प्रशिक्षक सायमन कॅटिच यांनी राजीनामा दिला आहे. आयपीएल 2022 च्या मेगा लिलावानंतरच कॅटिचने राजीनामा सादर केल्याचे सांगितले जात आहे. कॅटिचच्या राजीनाम्याचे कारण सध्या स्पष्ट झालेले नाही, परंतु न्यूज कॉर्पच्या सूत्रांचे म्हणणे आहे की आयपीएल (IPL) लिलावात फ्रँचायझीच्या धोरणांवर तो खूश नव्हता, त्यामुळे त्याने आपले पद सोडण्याचा निर्णय घेतला. (IPL Latset News Update)

आयपीएल 2022 सुरू होण्यास काही आठवडे शिल्लक असताना सायमन कॅटिचने राजीनामा दिला आहे. आयपीएल 2022 मध्ये सनरायझर्स हैदराबादच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी देखील कॅटिचचा माजी सहकारी आणि ऑस्ट्रेलियन टॉम मूडी यांच्या हातात आहे. सनरायझर्स हैदराबाद संघ दोन वेळा आयपीएल चॅम्पियन आहे.

लिलावात फ्रँचायझीच्या धोरणांवर कॅटिच खूश नव्हता

न्यूज कॉर्पच्या म्हणण्यानुसार, ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू सायमन कॅटिच आयपीएल लिलावात फ्रँचायझीच्या संघ नियोजनावर समाधानी नव्हता. संघ निवडण्याच्या पद्धतीशी तो असहमत होता. डेव्हिड वॉर्नरला खरेदी न करण्याच्या SRH फ्रँचायझीच्या निर्णयाशीही कॅटिचच्या राजीनाम्याचा संबंध जोडला जात आहे.

गेल्या मोसमात सनरायझर्स हैदराबादची कामगिरी अत्यंत खराब झाली होती. संघाने हंगामाच्या मध्यभागी आपला कर्णधार बदलला आणि 2016 मध्ये संघाला विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या जागी केन विल्यमसनला कर्णधार बनवण्यात आले. या मोसमातही संघाने बराच काळ संघासोबत खेळणाऱ्या राशिद खानला कायम ठेवले नाही.

IPL-2022 साठी सनरायझर्स हैदराबादच्या खेळाडूंची संपूर्ण यादी

वॉशिंग्टन सुंदर - रु 8.75 कोटी निकोलस पूरन - रु 10.75 कोटी टी. नटराजन - रु 3.6 कोटी भुवनेश्वर कुमार - रु 4.20 कोटी प्रियम गर्ग - रु 20 लाख राहुल त्रिपाठी - रु 8.50 कोटी अभिषेक शर्मा - रु 6.5 कोटी कार्तिक त्यागी 4 कोटी रु. गोपाल - रु 75 लाख जगदीश सुचित - रु. 20 लाख एडन मार्कराम - रु 2.60 कोटी मार्को यान्सन - रु 4.20 कोटी रोमारियो शेफर्ड - रु 7.75 कोटी शॉन ऍबॉट - रु. 2.40 कोटी आर. समर्थ - 20 लाख रुपये सौरभ दुबे - 20 लाख रुपये शशांक सिंग - 20 लाख रुपये विष्णू विनोद - 50 लाख रुपये ग्लेन फिलिप्स - 1.5 कोटी रुपये फजलहक फारुकी - 50 लाख रुपये

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT