KL Rahul and Athiya Shetty  Dainik Gomantak
क्रीडा

KL Rahul- Athiya च्या वेडिंगची सुनिल आण्णाने दिली मोठी अपडेट

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने राहुल आणि अथिया कधी लग्न करणार आहेत याचा खुलासा केला आहे.

दैनिक गोमन्तक

KL Rahul-Athiya Shetty Marriage: अथिया शेट्टी आणि केएल राहुल अनेकदा त्यांच्या नात्याबद्दल चर्चेत असतात. टीम इंडियाचा स्टार सलामीवीर केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी यांच्या अफेअरच्या बातम्या सतत चर्चेत असतात. दोघेही लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या अनेकदा आल्या आहेत. पण या अफवा नेहमीच सिद्ध झाल्या आहेत.

आता अथियाचे वडील आणि बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने राहुल आणि अथिया कधी लग्न करणार आहेत याचा खुलासा केला आहे. खरंतर सुनील शेट्टीने या गोष्टी इन्स्टंट बॉलीवूडला सांगितल्या. याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो राहुल आणि अथियाच्या लग्नाबद्दल खुलासा करताना दिसत आहे.

राहुल-अथिया ठरवेल लग्न केव्हा होईल

व्हिडिओमध्ये जेव्हा सुनीलला विचारले जाते की, अथिया आणि राहुलच्या लग्नाबाबत अनेक गोष्टी घडत आहेत. याबाबत काय तयारी सुरू आहे? त्यांच्या लग्नाबद्दल कधी सांगणार आहात? यावर प्रतिक्रिया देताना सुनील शेट्टी म्हणाला की, 'मुलांनी ठरवलं की लगेच. सध्या राहुलचं शेड्युल खूप टाइट आहे. आशिया कप आहे, विश्वचषक आहे, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया मालिका आहे. जेव्हा मुलांना सुट्टी मिळेल, तेव्हा ब्रेक घेवून ते एका दिवसात लग्न करू शकतात.'

राहुल-अथिया डिसेंबरमध्ये लग्न करू शकतात

केएल राहुल दुखापतीतून बरा झाल्यानंतर टीम इंडियात परतला आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याला कर्णधार बनवण्यात आले. भारताने ही मालिका क्लीन स्वीप करून जिंकली. आता राहुलला आशिया कपमध्ये खेळायचे आहे. ही स्पर्धा 27 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. भारतीय संघ 28 ऑगस्टला पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.

आशिया चषकानंतर भारतीय संघाला यंदाचा टी-20 विश्वचषकही खेळायचा आहे. यामध्ये केएल राहुलचे खेळणे जवळपास निश्चित मानले जात आहे. अशा परिस्थितीत राहुलकडे या वर्षी लग्नासाठी फारच कमी वेळ आहे. त्याचवेळी, मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल आणि अथिया वर्षाच्या शेवटी म्हणजेच डिसेंबरमध्ये लग्न करू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यातील BITS Pilani पुन्हा हादरलं! आणखी एका विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं; वर्षातील पाचवी घटना

Viral Video: पाण्याचा ग्लासच नाही बसलेली खुर्ची- टेबलही पुसलं, पुतिन भेटीनंतर 'पुरावे नष्ट'; किम जोंगना वाटतेय DNA चोरीची भीती?

GCA: 'जीसीए' निवडणुकीत 6 जागांसाठी 46 अर्ज! माजी सभापती पाटणेकरही रिंगणात; देसाईंना आव्हान

Goa Live News: बिट्स पिलानीमध्ये आणखी एका विद्यार्थ्याने संपवले जीवन

Thimmappiah Cricket: गोव्याचा मोसमपूर्व स्पर्धात्मक ‘सराव’ सुरु! विदर्भ, महाराष्ट्राशी भिडणार

SCROLL FOR NEXT