sunil gavaskar ravi shastri Dainik Gomantak
क्रीडा

IND vs WI: "वर्ल्ड कपमध्ये असल्या तमाशांची काय गरज?" ईडन गार्डन्सवरील हाय-व्होल्टेज सामन्यातील 'लेझर शो'वर भडकले शास्त्री-गावस्कर

Laser Show Controversy in Cricket: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्यादरम्यान कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर एक अभूतपूर्व दृश्य पाहायला मिळाले.

Manish Jadhav

Laser Show Controversy in Cricket: आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या सुपर-8 फेरीतील भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्यादरम्यान कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर एक अभूतपूर्व दृश्य पाहायला मिळाले. मात्र, या दृश्यामुळे भारतीय क्रिकेटचे दिग्गज सुनील गावस्कर आणि रवी शास्त्री यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सामन्यात ड्रिंक्स ब्रेकदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या झगमगाटी लेझर शोमुळे या दोन्ही माजी कर्णधारांनी खेळाडूंच्या एकाग्रतेवर होणाऱ्या परिणामांबाबत चिंता व्यक्त करत आयसीसीच्या या निर्णयावर कडक शब्दांत ताशेरे ओढले.

भारतासमोर (India) 196 धावांचे विशाल लक्ष्य असताना पॉवरप्लेच्या समाप्तीनंतर टीम इंडियाची स्थिती 2 बाद 53 धावा अशी होती. दोन्ही संघांचे खेळाडू मैदानावर रणनीती आखत असताना अचानक ड्रिंक्स ब्रेक घेण्यात आला. यावेळी सुमारे तीन मिनिटांसाठी स्टेडियममधील सर्व मुख्य दिवे मंद करण्यात आले आणि संपूर्ण मैदान लेझर शोच्या प्रकाशात न्हाऊन निघाले. प्रेक्षकांसाठी हे मनोरंजन असले तरी समालोचन कक्षात बसलेल्या सुनील गावस्कर यांना हा प्रकार मुळीच आवडला नाही. त्यांनी थेट सवाल केला की, विश्वचषकासारख्या गंभीर स्पर्धेत अशा प्रकारच्या तमाशाची खरंच गरज आहे का?

गावस्कर यांनी आपल्या खास शैलीत टीका करताना म्हटले की, "ड्रिंक्स ब्रेकच्या अवघ्या अडीच-तीन मिनिटांत लेझर शो करणे फलंदाजांसाठी अजिबात सोपे नसते. हे आयपीएलमध्ये ठीक आहे, पण हा जागतिक दर्जाचा वर्ल्ड कप आहे. नॉकआउट किंवा महत्त्वाच्या सामन्यांमध्ये अशा प्रकारच्या मनोरंजनाची आवश्यकता काय? प्रकाशझोतात अचानक होणाऱ्या या बदलामुळे फलंदाजांचे लक्ष विचलित होऊ शकते आणि त्यांच्या डोळ्यांवरही याचा परिणाम होतो."

गावस्कर यांच्या या विधानाला रवी शास्त्री यांनीही जोरदार पाठिंबा दिला. शास्त्री म्हणाले की, खेळाडूंच्या दृष्टिकोनातून विचार केला तर, अंधारानंतर पुन्हा एकदा प्रकाशात येऊन चेंडूवर लक्ष केंद्रित करणे अत्यंत कठीण असते. हे खेळाचे गांभीर्य कमी करणारे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

दरम्यान, या वादाच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाने आपली विजयाची घोडदौड कायम राखत उपांत्य फेरीत धडक मारली. टी-20 वर्ल्ड कप 2006 च्या सेमीफायनलचे चित्र आता स्पष्ट झाले असून दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि इंग्लंडसह भारताने अंतिम चारमध्ये स्थान मिळवले. आता उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा सामना न्यूझीलंडशी होईल, तर दुसऱ्या अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाचा मुकाबला बलाढ्य इंग्लंडशी होणार आहे. ईडन गार्डन्सवरील या लेझर शोच्या वादामुळे आता आगामी सामन्यांमध्ये अशा प्रकारचे प्रयोग टाळले जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT