Former Indian Cricketer Sunil Gavaskar and Mohammad Kaif (Cricket)  Dainik Gomantak
क्रीडा

Cricket: आयपीएल खेळताना खेळाडूंना 'वर्कलोड'चा त्रास होत नाही का? गावस्कर यांचा सवाल

१९ सप्टेंबर पासून आयपीएल स्पर्धेनंतर T२० विश्वचषकाला प्रारंभ (Cricket)

Siddhesh Shirsat

Cricket: इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेतील (Eng Vs Ind Test Series) चौथ्या सामन्याला 2 सप्टेंबर पासून ओव्हल (At Oval) येथे सुरुवात झाली. आज सामन्याचा शेवटचा दिवस आसून आता सामना कोणत्या संघाच्या दिशेने झुकेल किंवा सामना अनिर्णीत राहिल, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. हा सामना प्रत्येक दिवशी नाट्यमयरित्या कलाटणी घेत असल्याचे दिसून आले, कधी भारताच्या बाजूने तर कधी इंग्लंडच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळाला. प्रत्येक सामन्याप्रमाणे या सामन्यात देखील अनेक किस्से घडलेले पाहायला मिळाले. मग ते मैदानातील खेळाडूंमध्ये असो, स्टेडियम मध्ये बसलेल्या प्रेक्षकांमध्ये असो किंवा समालोचन कक्षात समालोचन करणाऱ्या समालोचकांमध्ये, असाच एक किस्सा काल खेळाच्या चौथ्या दिवशी समालोचन कक्षात घडला.

चौथ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात जेव्हा भारताची दुसऱ्या डावातील फलंदाजी संपुष्टात आली आणि भारतीय गोलंदाज मैदानात गोलंदाजीसाठी उतरले. जेव्हा बुमराह गोलंदाजी करायला आला तेव्हा समालोचनासाठी भारताचे जेष्ठ क्रिकेटर सुनील गावस्कर (Senior Former Cricketer Sunil Gavaskar) व त्यांच्यासोबाबत माजी क्रिकेटर मोहम्मद कैफ (Former Cricketer Mohammad Kaif) समालोचन करत होते.

समालोचन करतेवेळी मोहम्मद कैफ यांनी सुनील गावस्कर यांच्या निदर्शनास एक गोष्ट आणून देताना सांगितले की या सामन्यांमध्ये बुमराहच्या खांद्यावर गोलंदाजीची मोठी जबाबदारी आहे, कारण इशांत शर्मा व मोहम्मद शमी अनफिट असल्यामुळे भारतीय संघात उमेश यादव व शार्दूल ठाकूर या दोन गोलंदाजांना स्थान मिळाले. बुमराह सोबत गोलंदाज उमेश यादव वगळता इतर गोलंदाजांना फारसा अनुभव नाहीये त्यामुळे बुमराहवर सामन्याचा 'वर्कलोड' जास्त (Workload) आहे. तेव्हाच कैफला सुनील गावस्कर यांनी रोखले, आणि खेळाडूंवर असलेल्या 'वर्कलोड' वरील स्वतःची भूमिका स्पष्ट करताना मोहमंद कैफला म्हणाले, भारतीय संघात अंतिम अकरा जणांत खेळणे ही खूप मोठी गोष्ट असते, तसेच त्या अंतिम अकरामध्ये पोचण्यासाठी खूप मेहनत करावी लागते, नशिबाचीही साथ लागते. तिथे 'वर्कलोड' हा शब्द येणे चुकीचा आहे. कारण असे बरेच खेळाडू आहेत जे पराकोटीची मेहनत करून भारतीय संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि ज्यांना संघात स्थान मिळते ते सर्वोत्तम खेळाडू असतात. त्यामुळे 'खेळाचा वर्कलोड' हे कारण कोणत्याच खेळाडूचे असू शकत नाही.

जेव्हा हे खेळाडू आयपीएल सारख्या स्पर्धांमध्ये खेळतात, तेव्हा त्यांना वर्कलोडचा त्रास होत नाही का, असा प्रतिसवाल सुनील गावस्कर यांनी मोहम्मद कैफ यांनासमालोचनादरम्यान केला, त्यानंतर मोहम्मद कैफ हे काही क्षण निरुत्तर झाल्याचे पाहायला मिळाले.

इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर १९ सप्टेंबर पासून आयपीएल स्पर्धा (IPL) दुबई येथे सुरु होत आहे. आणि त्यानंतर T20 विश्वचषक असेल. त्यामुळे येत्या विश्वचषक स्पर्धेनंतर कोणत्याच खेळाडूचे आयपीएलचा 'वर्कलोड' होता, हे कारण असू नये, हीच खबरदारी भारतीय खेळाडूंनी घ्यावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panjim Fire: सेरेंडिपीटी महोत्सवाच्या स्टेजवर लागली आग, कर्मचाऱ्यांनी दाखवली तत्परता; पणजीत टळली मोठी दुर्घटना

Viral Video: शाळेच्या भिंतीवरुन उडी मारुन शेडवर उतरले, पण खाली पाहतो तर काय... क्लास बंक करणं पठ्ठ्याला पडलं महागात; पोरीनं काढला पळ

ICC Fine Team India: रोहित, विराटसह सर्वच खेळाडूंना धक्का! 'आयसीसी'ने ठोठावला दंड; एकदिवसीय मालिकेतील 'ती' चूक पडली भारी

Crime News: थंडीत मरण्यासाठी उंच पर्वतावर सोडलं, फोन सायलेंट केला, ब्लँकेटही दिलं नाही; गिर्यारोहक बॉयफ्रेंडनं गर्लफ्रेंडला मारलं? काय नेमकं प्रकरण?

Indigo Flights: मोपा विमानतळावर 8 तर दाबोळीत 9 विमाने रद्द; इंडिगोच्या गोंधळामुळे मुंबई, दिल्लीसह प्रमुख शहरांचे प्रवास ठप्प

SCROLL FOR NEXT