Sumit Nagal X/MaharashtraOpen
क्रीडा

Sumit Nagal: ऑस्ट्रेलियन ओपनमधील सुमीत आव्हान संपलं, दुसऱ्या फेरीत पराभवाचा धक्का

Australia Open 2024: सुमीत नागलला ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुसऱ्या फेरीत चीनच्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभवाचा धक्का बसला आहे.

Pranali Kodre

Sumit Nagal lost second-round Australian Open 2024 match against Juncheng Shang:

ऑस्ट्रेलियन ओपन 2024 स्पर्धा सध्या मेलबर्नमध्ये चालू असून या स्पर्धेत एकेरीसाठी भारताचा टेनिसपटू सुमीत नागल पात्र ठरला होता. दरम्यान नागलने या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवत इतिहासही रचला. मात्र, दुसऱ्या फेरीत त्याला गुरुवारी (18 जानेवारी) पराभवाचा धक्का बसला.

त्याला दुसऱ्या फेरीत चीनच्या 18 वर्षीय शँग ज्यूनचेंगने 6-2, 3-6, 5-7,4-6 अशा फरकाने चार सेटमध्ये पराभूत केले. त्यामुळे सुमीतचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

या सामन्यात सुमीतने शानदार सुरुवात केली होती. त्याने पहिल्या सेटमध्ये शँगवर वर्चस्व ठेवताना विजय मिळवला होता. मात्र नंतर शँगने चांगले पुनरागमन करत दुसरा सेट 3-6 ने जिंकला.

तिसऱ्या सेटमध्ये सुमीत - शँग यांच्यात बरोबरीची लढाई सुरू होती. त्यांना एकमेकांची सर्विस भेदणे कठीण जात होते. पण शँगने सेट पाँइंट जिंकत आघाडी घेतली. चौथ्या निर्णायक सेटमध्ये सुमीतने शँगला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. पण चौथ्या सेटही शँगने जिंकत सामना जिंकला.

दरम्यान, सुमीतने दुसऱ्यांदा ग्रँडस्लॅमच्या दुसऱ्या फेरीत पराभव स्विकारला आहे. यापूर्वी तो 2020 मध्ये अमेरिकन ओपनच्या दुसऱ्या फेरीत पोहचला होता, मात्र त्यावेळीही त्याला दुसऱ्या फेरीत पराभवाचा धक्का बसला होता.

तसेच 2019 मध्ये त्याने अमेरिकन ओपन आणि 2021 साली त्याने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पहिली फेरी खेळली होती. पण दोन्ही वेळी त्याला पहिल्या फेरीतच पराभवाचा धक्का बसला होता.

सुमीतने नोंदवलेला ऐतिहासिक विजय

दरम्यान, ऑस्ट्रेलियन ओपन 2024 स्पर्धेत पहिल्या फेरीत सुमीतने 31 व्या मानांकित ऍलेक्झँडर बब्लिकविरुद्ध 6-4,6-2,7-6 (7-5) असा विजय मिळवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे सुमीत 1989 साला नंतरचा ग्रँडस्लॅम स्पर्धेत मानांकित खेळाडूविरुद्ध विजय मिळवणारा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL Mini Auction 2026: धोनीच्या चेन्नईत नव्या दमाच्या खेळाडूंची एन्ट्री! दोन अनकॅप्ड खेळाडूंवर 28 कोटींची उधळण; प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा कोट्यधीश

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

IPL Mini Auction 2026: पैशांचा पाऊस! कॅमेरुन ग्रीनसह 'हे' 4 खेळाडू आयपीएल लिलावात मालामाल; मोडले सर्व रेकॉर्ड्स

SCROLL FOR NEXT