Sudhir Win Gold Medal Twitter
क्रीडा

Sudhir Win Gold Medal: सुधीरने पॅरापॉवरलिफ्टिंगमध्ये गोल्ड जिंकून रचला इतिहास

सुधीरने 212 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत भारताने प्रथमच सुवर्णपदक जिंकले आहे.

दैनिक गोमन्तक

Sudhir Win Gold in Commonwealth Games 2022: पॅरा पॉवरलिफ्टर सुधीरने कॉमनवेल्थ गेम्समध्ये इतिहास रचला. त्याने भारतासाठी सुवर्णपदक जिंकून मोठी कामगिरी केली. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात आता एकूण 6 सुवर्णपदके झाली आहेत. सुधीरने 212 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत भारताने प्रथमच सुवर्णपदक जिंकले आहे.

सुधीरने इतिहास घडवला

पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणारा सुधीर भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे. कॉमनवेल्थ गेम्सच्या पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा सुधीर हा पहिला भारतीय खेळाडू आहे. त्याने दुसऱ्या प्रयत्नात 134.5 च्या विक्रमी स्कोअरसह 212 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. सुधीरला मात्र शेवटच्या प्रयत्नात 217 किलो वजन उचलण्यात अपयश आले.

या खेळाडूंना रौप्यपदक मिळाले

नायजेरियाच्या इकेचुकवू क्रिस्टियन उबिचुकवू याने 133.6 गुणांसह रौप्यपदक तर स्कॉटलंडच्या मिकी युलने 130.9 गुणांसह कांस्यपदक जिंकले. ख्रिश्चनने 197 किलो तर युलने 192 किलो वजन उचलले.

मनप्रीतचे पदक हुकले

याआधी मनप्रीत कौर आणि सकिना खातून महिलांच्या लाइटवेट फायनलमध्ये अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर राहून पदकापासून वंचित राहिल्या, तर पुरुषांच्या लाइटवेट फायनलमध्ये परमजीत कुमार तिन्ही प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर शेवटच्या स्थानावर राहिला. मनप्रीतने पहिल्या प्रयत्नात 87 किलो आणि दुसऱ्या प्रयत्नात 88 किलो वजन उचलले, पण तिसऱ्या प्रयत्नात 90 किलो वजन उचलण्यात ती अपयशी ठरली. मनप्रीतला 89.6 गुण मिळाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT