Steve Smith Dainik Gomantak
क्रीडा

Steve Smith पुन्हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार! 'या' कारणामुळे घेण्यात आला निर्णय

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथकडे पुन्हा कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

Pranali Kodre

Steve Smith Australia Captain: ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज संघात सध्या 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना 8 डिसेंबर रोजी सुरू होणार आहे. पण या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स पूर्ण तंदुरुस्त झालेला नाही. त्यामुळे आता ऍडलेडला होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद स्टीव्ह स्मिथकडे सोपवण्यात आले आहे.

पर्थमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात कमिन्सचा मांडीचा स्नायू दुखावला होता. त्यातून तो पूर्णपणे अद्याप सावरेलेला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने त्यांच्या प्रमुख गोलंदाज आणि कर्णधाराच्या बाबतीत जोखीम घेण्याचे टाळले असून त्याला दुसऱ्या कसोटीसाठी आराम दिला आहे.

दरम्यान, 2018 साली कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर केवळ दुसऱ्यांदाच स्मिथ ऑस्ट्रेलियाचे कसोटीत नेतृत्व करताना दिसणार आहे. त्याने 2018 नंतर पहिल्यांदा गेल्यावर्षी इंग्लंडविरुद्ध ऍडलेड कसोटीतच कमिन्सच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले होते.

स्मिथने 2018 पर्यंत जवळपास 4 वर्षे ऑस्ट्रेलियाचा तिन्ही प्रकारातील नियमित कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळली होती. मात्र, 2018 साली केपटाऊन कसोटीत झालेल्या चेंडू छेडछाडीच्या प्रकरणात अडकल्याने त्याला कर्णधारपद सोडावे लागले होते. या घटनेला जवळपास 5 वर्षे झाल्यानंतर त्याच्याकडे गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचे नियमित उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

याशिवाय वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत स्कॉट बोलंडचे पुनरागमन झाले आहे. तो ऑस्ट्रेलियाकडून या सामन्यात अंतिम 11 जणांच्या संघातून खेळताना दिसणार आहे. तो अखेरचे जानेवारी 2022 मध्ये खेळला होता. त्यानंतर त्याला अंतिम 11 जणांमध्ये स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला होता.

दरम्यान, वेस्ट इंडिजविरुद्ध पार पडलेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 164 धावांनी विजय मिळवला होता. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. या सामन्यात मार्नस लॅब्युशेनने पहिल्या डावात द्विशतक आणि दुसऱ्या डावात शतकी खेळी केली होती. तसेच स्मिथनेही पहिल्या डावात द्विशतकी खेळी साकारली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजय मिळवणे सोपे गेले.

आता दुसरा सामना जिंकून यजमान ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश देण्याच्या प्रयत्नात असतील. तर वेस्ट इंडिजला मालिका वाचवण्यासाठी दुसऱ्या सामन्यात विजयाचीच आवश्यकता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: नाकेरी-बेतुल येथे भीषण अपघात; 23 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, भटक्या गुरांचा अडथळा ठरला जीवघेणा

KKR ला दुसरा 'मोठा' झटका! हर्षित राणानंतर आता 'हा' मॅचविनर खेळाडू IPL 2026 मधून बाहेर

Goa HSSC Result 2026: काऊंटडाऊन सुरू! अवघ्या काही तासांत 12 वीचा निकाल; 'या' सोप्या स्टेप्समध्ये पाहा तुमचा रिझल्ट

Viral Video: 'डायपर'चा असाही वापर! कोल्ड-ड्रिंक थंड ठेवण्यासाठी तरुणाचा 'देसी जुगाड', पाहा कसं बनवलं घरगुती मिनी फ्रीज

पदार्पण असावं तर असं! 15 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय टी-20 पदार्पणातच झळकावलं शतक, रचले दोन विश्वविक्रम Watch Video

SCROLL FOR NEXT